shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महानगरपालिका हद्दीमध्ये खासगी वाहने आणि खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनास ३१मार्चपर्यंत प्रतिबंध



            अहमदनगर, दि. २२- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन अहमदनगर महानगरपालिका हददीमध्‍ये नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी सर्व खाजगी वाहने व खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे वाहतूकीस दि.31 मार्चपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.


            हे आदेश खालील बाबतीत लागू होणार नाही. यामध्ये सर्व शासकीय सेवांशी निगडीत वाहने.रुग्वाहीकाअग्नीशमन वाहनेवैदयकीय उपचारासाठी लागणारे वाहने. (पुराव्‍यासह)सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयेसरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्‍थापना यांचे अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्‍यांसह)आजारी व्‍यक्‍ती तसेच रुग्‍णालय,पॅथॉलॉजी लॅबोरेटरी,दवाखाने आस्‍थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची वाहने. (मात्र ओळखपत्र आणी संबंधित पुराव्‍यांसह)भाजीपाला विक्री करणारे फेरीवालेएस.टी महामंडळ व अहमदनगर महानगरपालीका यांचेकडील बसेसमहानगरपालीका हद्दीतून जाणारे राज्‍य महामार्ग (पुणेऔरंगाबादमनमाडसोलापूरबीड व दौंडराष्‍ट्रीय महामार्गावरील (कल्‍याण-विशाखापट्टणममालवाहतूकीची वाहने.(मात्र मालवाहतूक करणा-या वाहनातील प्रवासी वाहतूक प्रतिबंधित राहील.)
            कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.       




शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com


संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५


close