shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाच्या आणखी ५ रूग्णांची पहिली टेस्ट ‘निगेटिव्ह’


पिंपरी-चिंचवड, पुणे, दि.२८ 
      पिंपरी चिंचवडमध्ये आणखी ५ कोरोनाच्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची पहिली टेस्ट ‘निगेटिव्ह’ आली आहे. काल कोरोनामुक्त तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यापैकी एका रुग्णाच्या घरातील चार बाधितांची टेस्ट आज ‘निगेटिव्ह’ आली आहे. तर थायलंडहून आलेल्या एका तरुणाची देखील टेस्ट निगेटिव्ह आली. या ५ रुग्णांना १४ मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज या रुग्णांचे दुसरे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.




सुरूवातीला पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक म्हणजे १२ रूग्ण होते. त्यानंतर गेल्या आठवडाभरात यासंख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. तर काल दि.२७ रोजी त्यातीला कोरोनामुक्त ३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलायं. आता आणखी ५ रूग्णांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आलेत. त्यांची दुसरी टेस्ट आज पुन्हा निगेटिव्ह आल्यास त्यांना उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.


शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-
 shirdiexpress7273@Gmail.com

संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५
close