shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये : आमदार निलेश लंके



अहमदनगर  | प्रतिनिधी |

      आमदार निलेश लंके यांनी जनतेला आवाहन करताना म्हणाले की,माझ्या तमाम मायबाप जनतेला मी निलेश लंके कळकळीची विनंती करतो की इटली चीन दुबई भारत यासारखे अनेक देशासह संपूर्ण विश्वात या कोरोना संसर्ग रोगाने हाहाकार माजविला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही या कोरोना विषाणूने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे . परंतु बंधु-माता भगिनींनो आपले जीवन हे अनमोल असून आपल्या बरोबर समाजाचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे .


        
       पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, डॉक्टर्स, नर्स ,अनेक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी कोरोना या महाप्रलयकारी विषाणूशी मुकाबला करण्यासाठी अहोरात्र आपल्या कुटुंबाचा  कुठलाही विचार न करता आपल्या सेवेत कार्यरत आहेत. त्या सर्व बांधवांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा आहेच ..!!
       
         पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातून अनेक ठिकाणा वरील जनता गावाकडे येत आहे व त्या मधून कोरोना संसर्ग अप्रत्यक्ष पसरवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा बंदी व राज्य बंदीचे आदेश पारित केले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक जबाबदाऱ व्यक्तिमत्व पूर्णवेळ अहोरात्र कष्ट घेत आहेत .
      
         माझ्या प्रत्येक बंधु-भगिनींनी घाबरुन न जाता हा संसर्ग रोखण्यासाठी आपापल्या घरी बसावे व जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाचे काटेकोरपणे  पालन करावे. मी त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी सुधाकरजी भोसले साहेब, नगर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब, तहसीलदार देवरे मॅडम ,उमेश पाटील यांच्यासह तालुक्यातील पोलीस अधिकारी गवळी साहेब, भोसले साहेब, बोरसे साहेब, राजपूत साहेब यांच्यासह अनेक प्रशासकीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत तसेच फोन द्वारे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
    
           सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत जनसेवा करत आहेत. तेव्हा माझे पुनश्च एकदा आपणास विनंती आहे की, आपण सर्व प्रशासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे कामाशिवाय बाहेर न पडता जमावबंदीचा आदेश असताना बाहेर न फिरता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे कारण तेही आपलेच बांधव आहेत व त्यांनाही कुटुंब असताना रात्रंदिवस आपले संरक्षण करत आहेत .याचे सामाजिक भान सर्वांनी ठेवावे.
        
          माझ्या मतदारसंघातील भूमिपुत्र असणारे व उद्योग,व्यवसायाच्या निमित्ताने पुना, मुंबई, ठाणे,कल्याण, नाशिकसह महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी असणाऱ्या माझ्या बांधवांना सुचित करतो कि, आपण आहे त्या जागेवरच रहावे, गावाकडील आपल्या बांधवांची काळजी करू नये व आपणही आहे त्या ठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत व्यवस्थित रहावे, आपणास काही अडचण असेल तर मला कधीही ९८२२५१५२५८ या नंबर वर संपर्क करावे अशी भावनिक विनंती पारनेर मतदार संघाचे आमदर निलेश लंके यांनी केली आहे.

शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com


संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५

             
close