एप्रिल फुल चे संदेश पाठविल्यास पोलीस कारवाई होणार:
कारवाई होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाचे आवाहन
मुंबई : 1 एप्रिल हा दिवस *एप्रिल फुल* म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी मोठया प्रमाणात नागरीक एकमेकांना फसवी माहिती पाठवून गंमत करत असतात. देशातील सध्याची आपत्तीची परिस्थीती पाहता सोशल मीडीयाद्वारे प्रसारीत होणारा कोणताही खोटा संदेश व त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण करु शकतात. 1 एप्रिल निमित्त्त नागरीकांकडुन जमावबंदी, कोरोना चे रुग्णांची माहिती, जीवनावश्यक वस्तूचे बाबत खोटे आणि फसवे मेसेज व्हायरल होण्याची शक्यता आहे. तरी पोलीस प्रशासनाद्वारे अशा मेसेजेसला नागरीकांनी बळी पडु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा स्वरुपाचे मेसेज लोकांकडुन सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास सदरचा मेसेज व्हायरल करणारा व त्याच्यासोबत त्या ग्रुपचा ॲडमिन यांचेवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल्. तरी ग्रुप ॲडमीन यांनी आपल्या ग्रूपमधील सर्व सदस्यांना याबाबत सुचना द्याव्यात तसेच ग्रुपचे सेटींग only admin असे करावे. अशा फसव्या मेसेजवर सायबर पोलीस ठाणे बारकाईने लक्ष ठेवुन आहेत.


