शिर्डी: प्रतिनिधी : -नगर-मनमाड राज्यमार्ग क्र.१० वर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे रिलायन्स पेट्रोल पंपावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास साखर कारखान्यातून साखर घेऊन निघालेला ट्रक रिलायन्स पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आले असता पेट्रोल पंपाच्या काही फुटाच्या अंतरावर डिझेल टँक अचानक फुटून इंजिन व टायर गरम असल्यामुळे आगीने पेट घेतला. यावेळी पेट्रोल पंपावरील काही कर्मचारी व परिसरातील स्थानिक लोकांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली परंतु ट्रक मधील साखर पोत्यांचे व ट्रक चा जागीच कोळसा झाला. यावेळी मनुष्यहानी मात्र टळली.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की कर्जत तालुक्यातील अंबालिका सहकारी साखर कारखान्यातून निघालेला क्रमांक एम.पी.१४ जीबी १४७७ कोपरगाव येथील गायत्री ट्रान्सपोर्टचा पूर्ण क्षमतेने साखरेचे पोते भरलेला ट्रक मध्य प्रदेशला जाण्यासाठी निघाला होता परंतु मध्य प्रदेश हे अंतर खूप जास्त आहे या हेतूने ट्रक चालकाने राहता तालुक्यातील कोल्हार येथील पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्याच्या हेतुने रिलायन्स पेट्रोल पंपावर आणले.
यावेळी पंपा पासून काही फुटांच्या अंतरावर या ट्रकचा डिझेल टॅंक फुटला व इंजिन व टायर गरम असल्यामुळे ट्रक ने क्षणात पेट घेतला. यावेळी विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे डायरेक्टर स्वप्निल निबे ,कामगार व अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले परंतु अर्ध्यातासातच ट्रकचा व साखरेच्या पोत्यांचा अक्षशः कोळसा झाला. त्यानंतर चाळीस मिनिटात आग आटोक्यात आली व यावेळी नागरिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे दोन पेट्रोल पंप जवळ असल्याने जो अनर्थ घडला असता तो सहीसलामत अनर्थ टळला हे विशेष.
शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-
shirdiexpress7273@Gmail.com