shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेम्स पाळंदे यांची इंडिया बुकात नोंद


राहुरी फॅक्टरी - दि. १९ मार्च २०२०
अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी फॅक्टरी येथील श्री विवेकानंद नर्सिंग होम चे कर्मचारी जेम्स पाळंदे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून शिवसेनेचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष सुनीलभाऊ कराळे यांचे हस्ते जेम्स पाळंदे यांना इंडिया बुक चे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 


    आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा पॅरामोटर पायलट आप्पासाहेब ढुस यांच्या सोबत पॅरामोटर मध्ये बसून को- पायलट जेम्स पाळंदे यांनी नुकतीच राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्च  वर हवेतून पुष्पवृष्टी करण्यास मदत केली होती. व अश्या पद्धतीने हवेतून पुष्पवृष्टी होणारे हे देशातील पहिले चर्च ठरले होते.  म्हणून आज को पायलट जेम्स यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, फादर विलास सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दादा गिरमे, महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष समिती चे कोशाध्यक्ष रामभाऊ काळे आदी उपस्थीत होते.



शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com

संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५

close