मुंबई | प्रतिनिधी |
प्रतीक्षा मुव्हीज निर्मित आणि रमेश एस.पवार दिग्दर्शित बात्तकु (एक वास्तविकता) या आगामी बिग बजेट मराठी चित्रपटाचे ऑडिशन काल हॉटेल विठ्ठल इन पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले, या मध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई,पुणे सांगली सातारा, नांदेड अश्या अनेक ठिकाणाहून अनेक दिग्गज कलाकाराने आपला सहभाग नोंदविला.
यामध्ये जेष्ठ नाट्य कलावंत आशूतोष नाटकर, शर्मा,कुलकर्णी मिथुन चित्रपटात मुख्य निगेटिव्ह रोल साकारणारे रोहित आवळे,
अश्या असंख्य कलाकारांची प्रमुख उपस्थिती होती.
हा चित्रपट सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात शूट होणार असून या मध्ये जास्तीत जास्त स्थानिक कलाकारांना संधी देऊन लवकरात लवकर या चित्रपटाचे शुटिंग सुरू करण्यात येईल अशी माहिती बात्तकु (एक वास्तविकता) या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
हा आगामी चित्रपट येत्या दिवाळी मध्ये प्रदर्शित होईल अशी माहिती पवार यांनी दिली.
या ऑडिशन साठी प्रतीक्षा मूव्हीजचे सर्वेसर्वा अशोक कुसाळकर,अंजना कुसाळकर,चित्रपटाचे दिगदर्शक रमेश पवार सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते.


