शिर्डी प्रतिनिधी:
कु.किरण जाधव
- विविध कार्यक्रमांना बंदी, सर्व धार्मिक स्थळे नागरिकांना प्रवेशासाठी बंद ...
- विहित कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई ..
- अत्यावश्यक सेवांना बंदी आदेशातून वगळले ..
कोरोना विषाणू संसर्गाचे जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करुनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 अन्वये विविध बाबींसाठी बंदी आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यावर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांनी आदेशित केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती/संस्था/संघटना भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 43 (1) मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी भाग श्री.गोविंद शिंदे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे.


