shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचे तीन रूग्ण ठणठणीत, आज ‘डिस्चार्ज’

पिंपरी-चिंचवड:

पिंपरी - प्रतिनिधी 
पुणे शहरातील दोन कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये दिलासादायक वातावरण असून १२ मार्च रोजी दाखल केलेले तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे दुसऱ्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज घरी सोडण्यात येणार आहे.



पुणे येथे सापडलेल्या दोन रुग्णांसोबत दुबई येथून आलेल्या शहरातील तीन जणांना करोनाची लागण झाली होती. त्यांना १२ मार्च रोजी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौदा दिवस त्यांच्यावर उपचार केल्यानंतर गुरुवारी त्यांची पहिली चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर आज त्यांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान त्यांना वायसीएम रुग्णालयातून आज डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर त्यांना पुढील चौदा दिवस घरातच थांबवे लागणार आहे. आठ दिवसापूर्वी शहरामध्ये राज्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या होती. मात्र महापालिकेच्या योग्य नियोजनामुळे सहा दिवसांत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यात पहिल्या तीन रुग्णांचे उपचारानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त होत आहे. या तीनही रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे.


शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-

 shirdiexpress7273@Gmail.com

संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५
close