shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निघोज येथील साई पालखी निवारात 142 लोकांना प्रशासनाने दिला आहे आसरा ।

सावळीविहीर।राजकुमार गडकरी। 
        राहता तालुक्यातील  गोरगरीब  मजूर व परराज्यातील  अशा एकूण 142 व्यक्तींना  या  कोरोनाच्या  संकटकालीन परिस्थितीत  शिर्डी जवळील निघोज येथील  साई पालखी निवारा मध्ये  ठेवण्यात आले असून  त्यांना जेवण व त्यांची इतर व्यवस्था प्रशासन  करत आहे, त्यांना लॉकडॉऊन संपेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.तसेच कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचे निदर्शनाला आल्याने व कोरोना रूग्णांच्या संपर्कात  आलेल्या  संशयित अश्या कोरोना रुग्णांना शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या फेज २ या धर्मशाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते, अश्या एकूण 60 रुग्णांपैकी काल 23 व आज 32 अशा एकूण55 रुग्णांना ठीक झाल्यानंतर आपापल्या घरी सोडून देण्यात आले आहे.अशी माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
     


देशात, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, तसेच या सापडलेल्या कोरोना च्या रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक जण आहेत.अशांना नगर व विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, काहीना  होम कॉंरटाईन करण्यात आले आहे.तर शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान च्या साई आश्रम फेज टू या धर्म शाळेतील हॉलमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करून येथे असे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले व संशयित एकूण 60 रुग्णांना गेल्या पंधरा दिवसा पूर्वी ठेवण्यात आले होते. चौदा दिवस येथे या रुग्णांना ठेवून त्यांच्यावर राहता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय गायकवाड,  ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गोकुळ घोगरे, डॉक्टर स्वाती मस्के व त्यांच्या वैद्यकीय पथकाने, साईबाबा संस्थान च्या वैद्यकीय पथकाने विविध औषध उपचार केले तसेच साई संस्थान मार्फत त्यांना जेवण ,नाश्ता ,चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.या कामी प्रशासनाला शिर्डी नगरपंचायत , साईबाबा संस्थान  ,राहता पंचायत समिती चे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे  यांनी मोठे सहकार्य केले या साठ रुग्णांपैकी 23 रुग्ण पूर्ण बरे होऊन त्यांना काल दि,19 ला सोडण्यात आले,तर त्यानंतर आज 32 रुग्णांना या विलगीकरण कक्षातून पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.       




काल आणि आज मिळून एकूण 55 संशयित रुग्ण पूर्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले. या लोकांनी या काळात  प्रशासनाने आमची सर्व व्यवस्था उत्तम ठेवली याबद्दल आभार मानले.त्याचप्रमाणे सध्या कोरोना मुळे  लॉकडाऊन सुरू असून या काळात सर्वसामान्य गरीब व मोलमजुरी करणारेंचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा राहता तालुक्यातील काही व्यक्तींना  तसेच संशयित रुग्णांना प्रशासनाच्यावतीने शिर्डी जवळील निघोज येथील साई पालखी निवारा मध्ये स्वतंत्र अशा विशेष कक्षामध्ये ठेवण्यात आले असून त्यांना येथे आरोग्य व सर्व सुविधा प्रशासन देत आहे.साई पालखी निवारा येथे 30 मार्च 20 20 रोजी एकूण 142 लोक येथे ठेवण्यात आले असून यामध्ये 30 परराज्यातील आहे व 112 महाराष्ट्रातील आहे.त्यामध्ये बारा महिला व दोन मुले असून या सर्वांची देखभाल व्यवस्थित करण्यात येत असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र काम धंदा बंद आहे.या मुळे सर्व गोरगरीब मजदूर यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे, अशा लोकांना या काळात अडचण भासू नये किंवा त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून शिर्डी जवळील साई पालखी निवारा येथे विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. 

या कक्षामध्ये गरजू गोरगरीब व संशयित काही रुग्ण अशी एकूण 142 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. 30 मार्च पासून येथे हे लोक ठेवण्यात आले असून 112 राज्यातील आहे,व 30 हे परराज्यातील आहे.यामध्ये बारा महिला व दोन मुले आहेत. या सर्व लोकांना सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गागरे व त्यांचे सर्व वैद्यकीय पथक, आरोग्यसेविका दररोज तपासणी व औषध उपचार करत आहेत.त्याच प्रमाणे निमगाव ,निघोज शिर्डी चे कामगार तलाठी  येथे देखरेख व व्यवस्था ठेवत आहेत. श्री साईबाबा संस्थान तर्फे या लोकांना सकाळ व संध्याकाळ दोन टाईम जेवण देण्यात येत आहे.त्याचप्रमाणे इतर सामाजिक संस्थांकडून नाष्टा, दोन वेळेस चहा देण्यात येत आहे. तसेच या लोकांना टी-शर्ट, साबण, टूथपेस्ट व इतर आवश्यक सामान देण्यात आले आहे. या लोकांची सर्व व्यवस्था प्रशासन उत्तम रीतीने करत असून या सर्व लोकांना या लॉकडाऊन काळात येथे ठेवण्यात येणार असून त्यांना कोणतीही अडचण भासू देण्यात येणार नाही .असे राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
close