shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अंबरनाथ शहरातील औद्योगिक क्षेत्रातुन १५ कोटी रूपयाचा निधि जमा



अंबरनाथ (जाफर वणू)
सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीत भरघोस मदत करावी याकरिता पालकमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ. बालाजी किणीकर व माजी नगराध्यक्ष श्री. सुनिल चौधरी यांनी एडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष श्री.उमेश तायडे यांच्या सोबत बैठक घेऊन अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांना आव्हान करण्यात आले.  




या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत भरघोस मदत केली. या मध्ये ए.एस.बी. इंटरनॅशनल कंपनीने १० कोटी इतका निधी दिला असून इतर कंपन्यांनी ५ कोटीहून अधिक निधी जमा केला असल्याची माहिती सोमवारी झालेल्या बैठकीत श्री.तायडे यांनी दिली. या बैठकीत ज्या कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत केली अशा सर्व कारखानदारांचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आभार मानले व अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील मदत न केलेल्या उर्वरित कारखानदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीत भरघोस मदत करावी असे आवाहन केले. तसेच अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना लॉकडाउनमुळे उपासमारीचा फटका बसु नये याकरिता ठाकूर पाडा, जांभिवली व फणसीपाडा याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी किचनचा ही आढावा या बैठकीत घेण्यात आला. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या कम्युनिटी किचन मार्फत दररोज हजारो कामगारांना जेवण दिले जात असून यामध्ये माजी नगराध्यक्ष श्री.सुनील चौधरी व आमाचे अध्यक्ष श्री. उमेश तायडे, आमाचे पदाधिकारी, तसेच श्री. नारायण मिसाळ व त्यांचा परिवार आणि फणसीपाडा येथील ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे.
close