shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली जिल्ह्यात कोरोना पाॅझिटीव्हचा आकडा 20 धाकधुक वाढली

हिंगोली/प्रतिनिधी (विश्वनाथ देशमुख)
दि.30 हिंगोलीत यापूर्वी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 वर जाऊन पोहचली होती. आज गुरुवारी हा आकडा 20 वर गेला असून मालेगाव येथून सेवा बजावून आलेल्या आणखी तीन एसआरपीएफ जवानसह जालना येथून आलेल्या जवानाच्या संपर्कातील दुसऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.


 गुरुवारी चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्याने रुग्ण संख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे.बुधवारी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हिंगोलीत खळबळ उडाली असतानाच गुरुवारी आणखी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हिंगोली करांच्या चिंता वाढल्या आहेत. मालेगाव येथून आलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांना याची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे तर जालना एसआरपीएफ दलात कार्यरत असलेल्या व कोरोना बाधित असलेल्या जवानाच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीसही कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी उघड झाले.गुरुवारी चार रुग्ण बाधित झाल्याने हिंगोलीची रुग्ण संख्या वीस वर जाऊन पोहोचली आहे. बुधवारी जिल्हा रेड झोन मध्ये गेला असताना गुरुवारी चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने जिल्हा प्रशासनास समोरील अडचणी वाढल्या आहेत. आता जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित वीस रुग्णांपैकी 16 जवान, दोन बालके व दोन व्यक्तींचा समावेश आहे.
close