shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन

मुंबई : बॉलिवूड मधील दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. कॅन्सरशी झुंज देण्यात अपयशी ठरलेल्या ऋषी कपूर यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 


ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला आहे. दरम्यान काल बुधवार रोजी अभिनेता इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही, तोच हि दुःखद घटना घडली आहे. 
ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
close