shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंगोली शहरात संचारबंदी लागु असतानाही माॅर्निंग वाॅकच्या नावाखाली फिरणा-या 23 जणावर कारवाई

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)दि.24 एप्रिल: 
हिंगोली शहरात संचारबंदी लागु असताना ही आज सकाळी माॅर्निंग वाॅकच्या नावाखाली फिरणा-या 23 नागरीकावर कारवाई करण्यात आली. कोरोना
विषाणुचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागु केली असतांना हिंगोली शहरात काही जण विनाकारण फिरत आहेत.नगर परीषद प्रशासन व पोलीस प्रशासनाकडुन वेळोवेळी अनावश्यक कामासाठी बाहेर पडु नका अशा सुचना करण्यात येत आहेत.







आज सकाळी डिवायएसपी श्री. व्यंजने साहेब,पोलीस निरीक्षक श्री.सय्यद साहेब व हिंगोली नगर परीषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या संयुक्त पथकाने माॅर्निंग वाॅकच्या नावाखाली फिरत असलेल्या 23 जणावर कारवाई केली आहे.कारवाई करण्यात आलेले नागरीक हे एम.जी.पी.ते बिरसा मुंडा रोड आणि एनटीसी परीसर भागातील असल्याचे समजते.नागरीकांनी अनावश्यक कामासाठी बाहेर पडु नये असे आवाहन नगर परीषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले आहे.
close