shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.प्रविण तोतला यांचा मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग संपन्न

प्रतिनिधी/हिंगोली (विश्वनाथ देशमुख)
दिनांक २४ एप्रिल रोज शुक्रवार ला दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान सेनगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विषयाचे डॉ. प्रविण तोतला यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या वाणिज्य शाखेतील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यासोबत झूम ॲप द्वारे संवाद साधला हिशेबशास्त्र या पाठ्यक्रमातील घसारा या विषयावर त्यांचे ऑनलाईन मार्गदर्शन झाले.



ऑनलाइन कार्यक्रमात महाराष्ट्रातील 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कोणत्याही व्यवसायात नफा किंवा तोटा माहीत करून घेण्यात संपत्तीत झालेली झीज याचे मूल्यांकन करणे फार गरजेचे असते. स्थिर संपत्तीच्या मूल्यात दरवर्षी तिच्या वापरामुळे, नवीन तंत्रज्ञान मुले घट होत जाते व यासाठी घसारा या शब्दाचा वापर व्यवसायात केला जातो घसारा काढण्याच्या पद्धती व त्याची आवश्यकता या विषयावर देखील विद्यार्थ्यांचे सविस्तर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आली. सदरील ऑनलाइन मार्गदर्शन बी. कॉम. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते याचा लाभ महाराष्ट्रभर कोरोना विषाणूच्या covid-19 बिमारी मुळे लॉक डाऊन असलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल द्वारे घरी बसून घेता आला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य एस. जी. तळणीकर ,श्री विठ्ठल वलेकर ,श्री भगवान खनपटे,डॉ. शंकर पजई, डॉ.बजाज, डॉ जोशी,प्रा. संदीप मारकड ,प्रा. तडस, प्रा फड  यांनी परिश्रम घेतले.
close