shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बदलापूर पश्चिम विभागातील 250/300 रिक्षा ड्रायवरला दानशूर वामन म्हात्रे व वीणा ताई म्हात्रे कडून धान्य वाटप.



बदलापूर :- जाफर वणू
     बदलापूर शहरात गेल्या दहा दिवसापासून लॉकडाऊन असल्याने सर्व रिक्षा बंद आहेत. त्यामुळे आता रिक्षा चालकाच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली होती. सर्व रिक्षा चालकाची व्यथा रिक्षा युनियन अध्यक्ष शिवाजी कराळे यांनी सध्या दानशूर असलेले वामन म्हात्रे यांना सांगितली. त्यांनीं लगेच सगळ्या रिक्षा ड्रायवरला व परिवाराला बोलावून आज धान्य वाटप केले. 




     यापूर्वी लॉकडाऊन झाल्यापासून रोज दुपार व रात्री दोन वेळचे जेवण बदलापूर पश्चिम येथे अखंड सूरू आहे . यामध्ये एक कौतुक करण्यासारखे म्हणजे हा सगळा खर्च ते कोणत्याही शासनाची मदत न घेता स्वखर्चाने करत  आहेत. रिक्षा ड्रायवर यांनी मनापासून वामन म्हात्रे यांचे आभार मानले.
close