shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार बालाजी देशमुख मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा-गोपाल सरनायक

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.26 हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गुगळ पिंप्री येथील पत्रकार बालाजी देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सरनायक यांनी हिंगोली च्या पालकमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.


अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार बालाजी देशमुख यांनी जलयुक्त शिवार बंधा-यावर अवैधरित्या वाळुचा वापर होत असल्याबद्दल बातमी प्रकाशित केली होती.या बातमीचा राग मनात धरून पत्रकार देशमुख यांना गुगळ पिंप्री येथील गावगुंडानी प्राणघातक हल्ला केला होता.या गावगुंडाना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.या प्रकरणी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ जाहीर निषेध करीत असुन गेल्या वर्षीच जर या गावगुंडावर पोलीसाकडुन गुन्ह्याची चार्जशिट दाखल केली असती तर आरोपीचे पत्रकारावर हल्ला करण्याचे धाडसच झाले नसते.आता तरी पोलीसांनी या प्रकरणाला गांभिर्याने घेऊन आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सरनायक यांनी हिंगोली च्या पालकमंत्री मा.वर्षाताई गायकवाड,मा.प्रकाशजी जावडेकर,केंद्रीय माहीती प्रसारण मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ऊध्दवजी ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
close