हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.27 हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी सचिन कायंदे यांनी आपल्या दोन एकर शेतात टोमॅटो या पिकाची लागवड केली तर सुमारे 500 झाडे शेवग्याची लागवड केली असुन देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे संपुर्ण देशात लाॅकडाऊन झाल्यामुळे पर जिल्ह्यातील बागवान शेतात येत नसल्यामुळे कायंदे यांचे शेतातच टोमॅटो व शेवगा जागीच जळुन जात असल्याने लाखो रूपयाचे नुकसान होत आहे.
देशात कोरोना संक्रमण गतिमान होत असल्याने कोरोना ला देशातुन हद्दपार करण्यासाठी 23 मार्च पासुन देशात लाॅकडाऊन व अनेक जिल्ह्याच्या सिमा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा फटका भाजीपाला लागवड करणा-या शेतक-यांना बसला आहे.सेनगांव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी सचिन कायंदे यांची आपल्या शेतात काही तरी नविन भाजीपाला घेण्याची उत्सुकता असायची आणि त्यांच्या मेहनतीचे फळ ही त्यांना दरवर्षी मिळायचे मागील काही वर्षापासून कायंदे आपल्या दोन एकर शेती मध्ये टोमॅटो व शेवगा ची लागवड करीत आहेत. या ही वर्षी त्यांनी लागवड केली. मात्र देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे संपुर्ण देश लाॅकडाऊन झाल्यामुळे त्याच्या शेतात टोमॅटो व शेवगा खरेदीसाठी पर जिल्ह्यातील बागवान येत नसल्यामुळे टोमॅटो व शेवगा शेतातच पडुन असल्याने ते जळुन जात असल्यामुळे कायंदे यांचे साधारणतः चार ते पाच लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
प्रतिक्रिया
मागील काही वर्षापासून मी माझ्या दोन एकर शेतीमध्ये टोमॅटो व शेवगा हे पिक घेत आहे.या पिकातुन मला चांगले उत्पन्न होत असे व पैसे ही भरपूर यायचे परंतु या वर्षी लाॅकडाऊन असल्यामुळे पर जिल्ह्यातील बागवान शेतात येण्यास तयार होत नाहीत.यामुळे टोमॅटो व शेवगा शेतातच पडुन असल्यामुळे माझे चार ते पाच लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.