येवला | प्रतिनिधी(संतोष राऊळ):
दोन दिवसांपूर्वी येवले शहरात प्रथम कोरोना रुग्ण आढळून आला होता. सदर रुग्ण ही एक महिला असून त्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटीव्ह आली होती. याच पार्श्वभिमीवर शहरात दि :26/04/2020 ते 28/04/2020 या तीन दिवसात सर्व पक्षीय मागणी नुसार बंद पाळण्याचे जाहीर केले.
तसेच कोरोना संसर्ग महिला राहत असलेल्या ठिकाणापासूनचा आजूबाजूचा सर्व परिसर लॉकडाऊन केला असून परिसरातील नागरिकांच्या तपासण्या वैद्यकीय पथक घेत आहे. अशातच सदर रुग्ण असलेली महिलेच्या परिवारातील लोकांच्या कोरोना चाचण्या घेतल्या असता त्या पॉझिटीव्ह आल्या आहेत.यामुळे आता येवले शहरात कोरोना रुग्णांची संख्या 5 झाली आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक नियमांचे पालन करताना दिसत आहे. येवल्या सह आता नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण 149 झाली आहे


