बदलापूर |प्रतिनिधी( जाफर वणू ):
आता पर्यन्त बिनधास्त असलेले बदलापूरकर या अचानक समोर आलेल्या प्रकाराने पुरते घाबरले आहेत.बदलापूर शहरामध्ये तीनजण कोराना बाधितरुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून बदलापुरकरांना हा एक प्रकारचा मोठा हादराच बसला असून बदलापुरकरांना आता जास्त काळजी घेण्याची अतिआवश्यक गरज आहे,
बदलापूर मध्ये एकही व्यक्ती कोरोना रुग्ण नाही या समाधानात बदलापूरकर असताना अचानक तीन व्यक्ती कोरोनो पाँझिटिव्ह आढळल्याने बदलापूर मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, बदलापूर (पुर्व) कात्रप परिसरात राहणारे पोलिस अधिकारी , त्यांची पत्नी व मुलगा असे कोरोना बाधित असलेले रुग्ण असून त्यांच्याच परिवारातील आठ जनांना कोरंटाईन करण्यात आल्याची माहिती बदलापूरचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अंकुश यांनी दिली आहे.


