shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजप अंबरनाथ उपाध्यक्ष दिपक कोतेकर व कु. सायली कोतेकर यांच्याकडून गरजु लोकांना व बेरोजगारांना माक्स आणि जिवनावाश्यक वस्तुचे वाटप.



अंबरनाथ | प्रतिनिधी | जाफर वणू

     कोरोनाच्या भयंकर रोगामुळे जगात व देशात धुमाकुळ घातला असून सरकारने लॉकडाउन केलेले आहे. तेव्हा दि. 25 मार्चपासून लॉकडाउन असल्याने घरात बसलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्यामुळे आलेल्या उपासमारिचे सावट लक्षात घेताच भाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटिल व शहर उपाध्यक्ष दिपक कोतेकर यांच्या मार्गदशनाखाली कु. सायली कोतेकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रभाग क्र.44 मध्ये सर्व गृहनिर्माण सोसायटी तसेच संपूर्ण परिसरात सर्वात प्रथम दि. 25 ते 29 मार्च 2020 रोजी दरम्यान एकूण 3000 माक्सचे वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे दि.5,6,7 मार्च 2020 रोजी अंबरनाथ पूर्वेकडील कुष्णा नगर, विठ्ठल मंदिर, होलार सोसायटी या परिसरात 412 गरजु लोकांना व बेरोजगार नागरिकांना दैनंदिन लगणाऱ्या जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले.



कोरोना सारख्या भयंकर विषाणुला हद्दपार करण्याकरिता चांगलाच संकल्प भाजपा अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिपक कोतेकर व कु. सायली कोतेकर यांच्याकडून राबविण्यात आला असून माझी इतर सर्व आर्थिक सक्षम व दानशूर व्यक्तींना आमची मनापासून विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे ,त्यांनी सर्व गरजूंना मदत करावी .

त्याचबरोबर वार्ड क्र. 44 या विभागात कोरोना वायरसला कसा रोखावा याबाबत जन जागृती केली. या प्रकारे ते नेहमीच समाजकार्य करून ते लोकांचे समस्या सोडविनण्याचे कार्य करीत असतात. तसेच कुणीही घराबाहेर पडू नका, घरातच रहा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश शहर उपाध्यक्ष दिपक कोतेकर तसेच कु. सायली कोतेकर यांच्याकडून देण्यात आला आणि नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
close