shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ वॉर्ड क्र. 57 चे नगरसेवक सचिन सदाशिव पाटिल यांच्याकडून गोरगरीबांना अन्नदान (जेवणाचे) वाटप.



अंबरनाथ :प्रतिनिधी: जाफर वणू

कोरोनासारख्या वाढत्या महाभयंकर प्रादुर्भाव जगात व देशात धुमाकुळ घातला असून सरकारने दि. 25 मार्च पासून ते 14 एप्रिल 2020 रोजी पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला असून या लॉकडाउनमुळे  घरात थांबलेल्या बेरोजगार व नागरिकांना कामधंदा नसल्याने उपासमारिची वेळ लक्षात घेताच राष्ट्रवादी कांग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटिल यांच्याकडून अंनपा हद्दितील वॉर्ड क्र. 57 मधील गरजु गोरगरीब, बेरोजगार, कामगार व रोजंदारीवर अवलंबित असलेल्या लोकांना अंबरनाथ पूर्वेकडील सचिन हॉटेल, आंनदनगर या ठिकाणी मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप करण्यात आले. तसेच हा उपक्रम  दि. 14 एप्रिल 2020 रोजीपर्यत मोफत ठेवण्यात आला आहे. या मोफत अन्नदान (जेवणाचा) लाभ सुमारे 1200 ते 1300 लोकांना देण्यात येत आहे. अशी माहिती नगरसेवक सचिन सदाशिव पाटिल यांनी दिली. तसेच या अगोदारही वॉर्ड क्र. 57 मध्ये गोरगरीब व आदिवासी वाड़ी, पाडयातील नागरिकांना जीवनावश्यक वाटप करण्यात आले.



त्याचप्रमाणे वार्ड क्र. 57 मध्ये कोरोना वायरसला कसा रोखावा याबाबत जन जागृती केली. या प्रकारे ते नेहमीच समाजकार्य करून ते लोकांचे समस्या सोडविण्याचे कार्य करीत असतात. तसेच कुणीही घराबाहेर पडू नका, घरातच रहा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असा राष्ट्रवादी कांग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटिल व स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटिल यांच्याकडून देण्यात आला आणि नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटिल, उमेश तायड़े, व्हर्टिव कंपनीचे मैनेजर मंगेश सावंत, बाळाशेठ जाधव, जगदीश तांबे, जीवन पाटिल, विजय सावंत, अमर इचके, राहुल पाटिल आदी उपस्थित होते.
close