shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड जिल्ह्यातील बहुजन समाजाच्या जीवनावश्यक गरजांकडे पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे : डाॅ.संजय सोनावणे.



    बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )
      देशासह राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरू केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील  बहुजन समाजातील सर्व जनतेला जीवनावश्यक वस्तूंची फार मोठी गरज भासत आहे. त्यामुळे या समाजाकडे कडे रायगड जिल्हाच्या विद्यमान पालक मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी लक्ष घालावे अशी विनंती रायगड जिल्हातील दानशूर व्यक्तीमत्व नामवंत उद्योजक, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष डाॅ.संजयजी सोनावणे साहेब यांनी दिनांक ११ एप्रिल २०२० रोजी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ बोलताना सागीतले.



      डाॅ.संजयजी सोनावणे यांनी म्हटले आहे की, देशात तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढतच चालला असल्याने रायगड जिल्ह्यातील बहुजन समाजातील अनेक कुटुंब अशी आहेत की ती रोज हातावर कमवून खाणारी आहेत. देशातील लाॅकडाऊन मुले या कुटुंबातील लोकांवर मोठी उपास मारीची वेळ आली असून रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य बहुजन समाजातील अनेक व्यक्ती शासकीय नोकरदार नाहीत. तर काही खासगी कंपनीत काम करतात  लाॅकडाऊनमुळे खाजगी कारखाने देखील बंद झाले असून या कोरोनाच्या प्रादुर्भावने भयभीत झालेले मुंबईतील चाकरमणी देखील नोकरी धंदा सोडून गावाला आल्यामुळे या कूडूबांना एक वेळचे जेवण मिळणे देखील या पुढे कठीण होणार असून अश्या कुटुंबातील लोकांना रायगड जिल्हाचे खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब तसेच विधान परिषदचे आमदार आनिकेत भाई तटकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री, नामदार आदितीताई तटकरे यांनी लक्ष घालून व या गरीब गरजू कुटुंबातील लोकांना अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूचा शासनाच्या मार्फत पुरवठा करावा अशी विनंती डाॅ. संजय सोनावणे यांनी केली आहे.   
close