shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या पत्राची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल - प्रा.श्रीकांत मुद्दे




  • लाॅकडाऊनमुळे वडार समाजावर आली उपासमारीची वेळ :


  लातूर | प्रतिनिधी |
         
संपुर्ण जगात कोरोना या वैश्विक महामारीने थैमान घातले आहे, त्यातच भारतासह महाराष्ट्रात देखील या कोरोनाने अनेकांचे बळी घेतले आहे, या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात लाॅकडाऊनचे पर्वसुरूआहे. लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या व दररोज काम करून पोटाची खळगी भागवणार्या मजुरांचे अत्यंतिक हाल होत आहेत.याचा फटका अनेक भटक्या व विमुक्त जमातीतील नागरिकांना त्यांचा कायम स्वरुपीचा ठावठिकाणा नसल्यामुळे कुठेही पालं टाकून जीवन जगणार्यांना व  साधे रेशनकार्ड देखील नसनार्यांना  बसला आहे.त्यातल्या त्यात विशेषतः वडार समाजातील भटकंती करणार्या लोकांना याची मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली आहे. 



ज्या समाजाने देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, ज्यांनी,गड,किल्ले,राजवाडे,रेल्वेलाईन,बोगद्यांची निर्मिती, रस्ते,धरणे,तलाव,पाट,बंधारे,विहीरी ,मोठ मोठ्या टोलेजंग इमारतींची निर्मिती केली आहे अशा वडार समाजाच्या हाती लाॅकडाऊनमुळे काम नसल्यामुळे हातावर पोट चालवणार्या समाजावर आज 100 % उपासमारीची वेळ आली आहे.     

हातात पैसा नाही ,शासकीय मदत नाही, त्यांनी अशा परीस्थितीमध्ये काय करावं..? काय खावं..? कुणाकडे जावं..? शिक्षण नसल्यामुळे पदाधिकारी,अधिकारी यांच्याबरोबर बोलायचे कसे ..??याबद्दल माहिती नाही, मुकाट्याने काही दिवस उपाशी रहाणे पसंत केले परंतू त्यांचे हाल सध्य परिस्थितीत पहावेना,अशी गत निर्माण झाली आहे. अनेकांना निश्चित कायमस्वरूपी गाव नाही, त्यामुळे  त्यांना शासकिय योजनांचे लाभ मिळणेही दुर्लभ झाले आहे. 
           
या पार्श्वभूमीवर वडार समाजाची महाराष्ट्रभर होत असलेली हालाखीची स्थिती पाहता व हाताला काम नसल्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.  अशा आपत्कालीन परिस्थितीत हातावर पोट घेऊन जगणा-या वडार समाजाला मदत मिळावी म्हणून वडार समाज संघ,महाराष्ट्र यांच्या वतीने मा.श्रीकात मुद्दे ,लातूर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी मा.उद्धवजी ठाकरे साहेबांना दोन दिवसापूर्वी पञ पाठवण्यात आले होते. त्याची दखल मंञालय कार्यालयाने घेतली असून पुढील कार्यवाहीस पाठविले असल्याचे कळविले आहे.असे वडार समाज संघाचे प्रमुख कार्यकर्ते मा.श्रीकांत मुद्दे यांनी शिर्डी एक्सप्रेसच्या  प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.
close