कोपरगाव- प्रतिनिधी :
पी एम किसान ,जण धन योजना, गरीब कल्याण योजना, मातृवंदना योजनेचे पैसे तसेच इतर कोणत्या हि बँकेचे पैसे आता घरपोहच काढून मिळणार पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून.
सध्या कोरोना हा विषाणू च्या वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील लाँकडाऊन हा 30 एप्रिल पर्यंत सरकारने वाढविला आहे.परंतु विविध योजनेचे पैसे सरकारने सध्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेले आहे.त्यामुळे नागरिकांना पैशाच्या गरजेमुळे बँकेमध्ये फार गर्दी होत आहे तसेच काही लाभार्थी पैशाची गरज असून देखील ही कोरोना च्या भितीमुळे घराबाहेर पडणे टाळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या उद्देशाने व बँकेत व बँकेसमोर गर्दी होऊ नये या उद्देशाने डाक विभागाने पुढील पाऊल उचलले आहे.
आता नागरिकांना घराबाहेर पडण्याची गरज नाही. नागरिकांना डाक विभाग घरपोहच पैसे देण्यासाठीची सेवा देईल तसेच नागरिकांना पी एम किसान जनधन योजना, गरीब कल्याण योजना, मातृ वंदना योजनेचे पैसे व तसेच इतर कोणत्याही बँकेचे पैसे आता पोस्टमन नागरिकांना AePS च्या माध्यमातून घरपोच देणार आहे. त्यासाठी फक्त ग्राहकाचे ज्या बँक मध्ये खाते आहे त्याला आधारकार्ड अद्यव्यात केलेले असावे.
प्रत्येक खेड्यामध्ये बँक उपलब्ध नसल्याने जवळच्या मोठ्या गावांमध्ये बँक आहे तेथे जाण्यासाठी लाभार्थी घराच्या बाहेर पडत आहे त्यामुळे लाँकडाऊन च्या अंमलबजावणीमध्ये सरकारी यंत्रणांना बाधा येत आहे यावर उपाय म्हणून पोस्ट खात्याने हा पर्याय शोधला आहे.
पोस्ट ऑफिस मधील सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेत सहभागी आहेत आणि जवळपास सर्वच खेडोपाडी असणारे पोस्ट ऑफिस चालू आहे ज्या गावांमध्ये बँक उपलब्ध नाही त्या ठिकाणी देखील पोस्ट ऑफिस कार्यरत आहे तेथील नागरिकांचे जर प्रधानमंत्री जनधन योजनेचे, किसान सन्मान योजनेचे, गरीब कल्याण योजनेचे, मातृवंदना योजनेचे पैसे जमा झाले असतील तर त्यांना बँकेत जाण्याची गरज नाही हे लाभार्थी त्यांच्या गावातील पोस्टमन ग्रामीण डाक सेवक यांच्यामार्फत त्यांच्या बँकेतील खात्यावर जमा झालेले पैसे देखील काढू शकतात त्यासाठी त्यांना त्यांचां आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर एवढीच माहिती पोस्टमन किंवा पोस्टमास्तर याना सांगावी लागते पोस्टमन ग्रामीण डाक सेवक त्यांचे बायोमेट्रिक घेऊन किंवा OTP घेऊन त्यांचे पैसे काढून देऊ शकतात पोस्टाचे या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्याची गरज नाही ही सोय घरपोच दिली जाते तसेच यामध्ये गर्दी होण्याचा देखील धोका नाही शिवाय सर्व पोस्टमन ग्रामीण डाक सेवक यांना स्वतःची तसेच ग्राहकांची आरोग्यविषयक काळजी घेण्याची सूचना देण्यात आले आहे त्यांना निर्जंतूकीरण्यासाठी सँनिटायझर देखील पुरवण्यात आली आहेत सर्व व्यवहार करताना सरकारी नियमाचे सर्वानी पालन करावे आणि व्यवहार करताना यौग्य ते अंतर ठेवावे त्यामुळे ज्या नागरिकांना जर प्रधानमंत्री जनधन योजनेचे किसान सन्मान योजनेचे गरीब कल्याण योजनेचे मातृत्व वंदनेचे पैसे जमा झाले असतील तर त्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल नंबर घेऊन आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये अथवा पोस्टमन ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान कोपरगाव उप विभागाचे डाक निरीक्षक श्री विनायक शिंदे यांनी केले आहे. तसेच याचा फायदा श्रीरामपूर विभागांर्तगत येणारे तालुक्यांनी देखील घ्यावा असे देखील आवाहन श्री एस रामकृष्ण साहेब डाक अधीक्षक व श्री संतोष जोशी साहेब उप अधीक्षक श्रीरामपूर यांनी केलेले आहे.
श्रीमती दिपाली पंडित पोस्टमन लोणी यांनी श्रीमती प्रभावती मंगळ यांना घरी जाऊन बचत खात्यातील पैसे दिले त्यांचे वय 84 वर्ष असून दोन्ही मुले अमेरिकेत असतात जेव्हा पोस्टमन पैसे दिले त्यावेळेस त्या खूप भावनुक झाल्या व पोस्ट ऑफिस स्टाफ फार अडचणीच्या काळात कामाला आले त्याबद्दल त्यांनी पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले व ऐन वेळेस मिळालेल्या मदतीमुळे त्यांनी इतरांना देखील हाच सल्ला दिला तसेच वयोवृद्ध लोंकानी पोस्ट ऑफिस मध्ये न जाता घरी बसल्या बसल्या पोस्ट ऑफिस चा फायदा घेऊ शकतात