- तब्बल पाच हजार शेतकर्यांचा थकित उस बिलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार.
राहुरी/अहमदनगर - दि. 24
नगर जिल्ह्य़ातील कौठा मलकापूर येथील यु टेक शुगर कडून जवळपास पाच हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जानेवारी २०२० पासून ऊस पेमेंट मिळाले नाही, म्हणुन महाराष्ट्र राज्य तुकडे बंदी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कडे याबद्दल तक्रार केली आहे. ढुस यांचे तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असुन त्यामूळे तब्बल पाच हजार शेतकर्यांचा थकित उस बिलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
सध्या कोरोना लाॅकडाउन मध्ये शेतकरी सर्व बाजुने अडचणीत सापडला आहे, अहमदनगर जिल्ह्यातील यू टेक शुगर व्यवस्थापनाने जानेवारी महिन्यात उस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत उस पेमेंट अदा केलेले नाही. तसेच मागिल वर्षी सुद्धा वेळेवर पेमेंट मिळाले नसलेची शेतकरी बांधवांची तक्रार आहे. त्यामूळे कारखाना व्यवस्थापनाने त्वरीत शेतकरी बांधवांची थकित उस बिलांची रक्कम आदा करावी म्हणुन ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री महोदय याना पत्र देऊन विनंती केली आहे.
सध्या शेतकऱ्यांना मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची कामे व पुढील पीक उभारणी साठी आवकश्यक त्या शेतीच्या इतर गोष्टी म्हणजे खते, बी बियाणे आदी कामे करण्यासाठी पैश्यांची अत्यंत गरज आहे. म्हणुन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्या पुर्वी आप्पासाहेब ढुस यांनी यु टेक शुगर चे रवींद्र बिरवले यांचेशी फोनवर समक्ष चर्चा केली असता लॉक डाउन मुळे पेमेंट करायला अडचण येत असल्याचे कारण बिरवले यानी ढुस याना सांगितले.
लॉक डाउन जाहीर झालेची तारीख व जानेवारी महिन्यातील ऊस पेमेंट याचा कोठेही अर्थाअर्थी संबंध
असल्याचे जाणवत नाही. नियमानुसार पंधरवडा पेमेंट लॉक डाउन पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मुदतीत वर्ग होणे अपेक्षित होते, परंतु तसे न झालेने यु टेक कडून ऊस पेमेंट बाबद नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे ढुस याना जाणवले. तसेच जिल्ह्यातील इतर कोणत्याही साखर कारखान्याचे जानेवारी महिन्यातील शेतकऱ्यांचे देयक देणे बाकी असल्याचे दिसत नाही. त्यामुळे यु टेक शुगर कडून शेतकऱ्यांची अडवणूक झाली असल्याचे स्पस्ट झालेने ढुस यानी मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणुन दिली आहे.
ज्या अर्थी लॉक डाउन पूर्वीचे जानेवरीतील शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट यु टेक शुगरने अडकवून ठेवले आहेत त्या अर्थी उसाचे पेमेंट वर्ग करायला यु टेक शुगर टाळाटाळ करीत आहे या शेतकऱ्यांच्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. व शेतकऱ्यांना हे पेमेंत वेळेवर मिळाले नाही तर पैश्या अभावी शेतकऱ्यांचे पुढचे पीक हातातून जाणार आहे. व त्यामूळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी आर्थिक कोंडी होणार आहे.
लॉक डाउन जाहीर झालेची तारीख व जानेवारी महिन्यातील ऊस पेमेंट याचा कोठेही अर्थाअर्थी संबंध असल्याचे जाणवत नाही. तसेच नियमानुसार पंधरवडा पेमेंट लॉक डाउन पूर्वी शेतकऱ्यांच्या खाती जमा होणे गरजेचे होते पण तसे झाले नाही म्हणुन आप्पासाहेब ढुस यांना नाविलाजास्तव मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करावी लागली आहे.
यू टेक शुगर कडील देणी अदा करण्यासाठीच्या आप्पासाहेब ढुस यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यानी दखल घेतल्याने जिल्ह्यातील तब्बल पाच हजार शेतकर्यांचा उस बिलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.


