उल्हासनगर - जाफर वणू
पत्रकार रामेश्वर गवई यांची सुकन्या कुमारी प्रणाली हिचे अल्पश: आजाराने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी दि.२० एप्रिल २०२० रोजी सोमवारी संध्याकाळी ०७.३० वा . दु:खद निधन झाले. तिच्यामागे तिचे वडील रामेश्वर गवई, आई सौ. उषा, बहिण कु. हर्षल व भाऊ कु. ह्रषिकेश असा छोटासा परिवार आहे. प्रणाली व हर्षल या दोघी जुळ्या बहिणी अभ्यासात हुषार. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकत होत्या. नेहमी ९० टक्के पर्यंत दोघीही मार्क मिळवत असत व प्रथम वर्गात येत असत. तसेच दहावीनंतर तीन वर्षाचा इंजिनिअरिंग यु. पी. एस. डिप्लोमा केला. त्यानंतर तीन वर्षांत इंजिनिअरिंग एम. पी. एस. डिग्री कोर्स केला असता दोघीही प्रथम वर्गात पास झाल्या. प्रणालीला जनरल पोस्ट आँफीसमध्ये (मुंबई हेड आँफीस) नोकरीचा काँल आला होता. पण तिने तो नाकारला. कारण ती उपजिल्हाधिकारी या पदासाठी मेहनत घेत होती.
दि. ७ एप्रिल रोजी परिक्षा होती मात्र तिच्या ती नशिबी नव्हती. संचारबंदीमुळे आणि लॉकडाऊनमुळे ती घरातच अडकली होती. त्याच्यातच तिला हिंवतापाने घेरले. सरकारी व खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ७ एप्रिल रोजी संपूर्ण बरी होऊन घरी येऊन २० दिवस झाले होते. दोन दिवसांपूर्वी अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. उल्हासनगर कँप नंबर ४ येथील धन्वंतरी हाँस्पीटलमध्ये अँडमिट केले होते. तिथे तिच्या सर्व तपासणी झाल्यावर तिला काविळ झाल्याचे समजले. कावीळ संपूर्ण अंगात भिनली होती. अखेर तिच्यावर काळाने झडप घातली आणि तिची प्राणज्योत मालवली. रामेश्वर गवई फक्त पत्रकारच नव्हे तर समाज सेवकही आहेत. दररोज शासकिय मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन रुग्णांची सेवा करतात. गोरगरीब रुग्णाना मदत करतात. सर्व डाँक्टर, सिस्टर व अन्य हाँस्पीटलमधील स्टाफ यांच्याजवळ चांगले संबंध असल्याने पत्रकार रामेश्वर गवई यांना नेहमी सहकार्य मिळते. अशा एका सर्व सामान्य समाज सेवक व रुग्ण मित्राला स्वतःच्या मुलीच्या देहाला खांदा घालण्यासाठी कठीण वेळ आली. मुलीचे भवितव्य साकारण्याचे स्वप्न धुळीला मिळाल्याने आई वडील हतबल झाले आहेत. उल्हासनगर कँप नंबर,३ येथील शांतीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार रात्री ११ वा. पार पडला. अंत्यसंस्काराच्या वेळी कोरोनामुळे पोलिसांनी स्मशानभूमीत फक्त १० लोकांनाच सोडण्यात आले. स्मशानभूमीच्या गेटच्या बाहेर शेकडो नातलग, मित्रमंडळी व पत्रकार उभे होते. पण पोलिसांनी आपल्या वर्दीचा माज दाखवत अवार्च्य भाषेत शिवीगाळ करून सर्वांना शासकीय नियंमांचे पालन करून सर्वांना घरी जावयास सांगितले.
कु. प्रणालीच्या मृत्यूला प्रशासन व वैद्यकीय अधिकारी जबाबदार असून लॉकडाऊन आणि डॉक्टराचा बेजबाबदार व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गवई यांनी केला.


