shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ठाणे जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीणकडून आदिवासी पाड्यात आणि गरजू लोकांना मदतीचा हात.

बदलापूर :- अरूण ठोंबरे 
       लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने आता राष्ट्रवादीने आपला मोर्चा  हा ग्रामिण भागाकडे वळवला आहे. कारण प्रत्येक  सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांनी ग्रामीण आणि आदिवासी पाड्यावर मदत पोहचविणे आवश्यक आहे, म्हणुन आज  ठाणे जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण कडून अविनाश देशमुख ह्यांनी आपला मदतीचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला, त्यांच्या  म्हणण्यानुसार शहरात मदतीची आवश्यकता आहेच पण ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, सध्य परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे कुठलेही साधन नाही , मदतीसाठी त्यांना शहराकडे जावे लागते पण  लॉक डाऊन मूळे ते शक्य नाही अश्या परिस्थितीत आपण मदत घेऊन त्यांच्या कडे पोहचविणे गरजेचे आहे , 




     कित्येक लोक स्थलांतर करत असतानाच त्यांना मदत करणे हे आपले महत्वाचे काम आहे आणि ह्यातून आज शेकडो लोकांना रस्त्यावर खाण्याच्या वस्तू देण्यात आल्या आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसने हेच केले. ह्या सोबत पोलीस कर्मचारी जे ग्रामीण भागात गस्तीवर आहेत त्यांना मदत अपुरी आहे, पुरेशा आवश्यक वस्तूची वाणवा आहे, सॅनिटाइझर ,ग्लॉज, मास्क नाहीत त्याची आज व्यवस्था  करण्यात आली, चेक पोस्टवर पोलिसांना जेवण आणि गरजू वस्तू  देण्यात आल्या. ह्या पुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष श्री दशरथजी तिवरे ह्यांच्या मार्गदर्शना खाली लोकांसाठी काम करण्यात येईल असे अविनाश देशमुख ह्यांनी सांगितले. साहित्य वाटप करत असताना महाराष्ट्र पोलीस ह्यांनी आदिवासी  पाड्यातील गरजू लोकांना मदत करताना सहयोग दिला.
close