shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुका कोरोना मुक्त, मात्र दक्षता घेण्याची गरज - तहसीलदरा कुंदन हिरे

सावळीविहीर ।राजकुमार गडकरी।
     राहाता तालुक्यातील लोणी येथील एक कोरोना रुग्ण यांची आज दुसऱ्यांदा अहमदनगर सिव्हिल  हॉस्पिटल येथे टेस्ट केली असता ती निगेटिव आल्याने हा राहता तालुक्यातील एकमेव कोरोना ग्रस्त रुग्ण या रोगापासून मुक्त झाल्याचे व त्यांना घरी सोडून देण्यात आल्याचे राहता तहसीलदार कुंदे यांनी सांगितले.या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पंचावन्न संशयित रुग्णांनाही काल व परवाच घरी पाठवण्यात आले होते ते शिर्डीला साई आश्रम धर्म शाळेमध्ये  विलगीकरण कक्षात होते. 




हा एकमेव राहता तालुक्यातील लोणी परिसरातील कोरोना बाधीत रुग्णांचे 14 दिवसांनंतर व औषध उपचारानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर राहता तालुका हा कोरोना मुक्त झाल्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.त्यामुळे राहता तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. 

मात्र सर्वांनी यापुढेही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र शासनाने 20 एप्रिल 2020 पासून काही ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध अंशत: शिथिल केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहाता तालुक्याच्या लॉकडाऊनसंदर्भातील भ्रम दूर होण्याच्यादृष्टीने सर्व नागरिकांना तालुक्यातील लॉकडाऊन स्थिती पुर्वीप्रमाणेच 3 मे, 2020 पर्यंत कायम राहणार असून जनतेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात सहकार्य केले असून येथून पुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे. या कालावधीत आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद राहणार असून प्रवासी टॅक्सी, बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस, औद्योगिक आस्थापना, सिनेमा थिएटर, मॉल, व्यायामशाळा, स्विमींग पुल, मनोरंजन केंद्र, मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, मनोरंजनाच्या व धार्मिक कार्यक्रमास प्रतिबंध असून सार्वजनिक ठिकाणी, धार्मिक स्थळी सामुदायिक कार्यक्रम, पुजा पाठ, नमाज पठण करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्यविधी जास्तीत जास्त 20 व्यक्तिंच्या उपस्थितीमध्ये, सामाजिक अंतर राखूनच पार पाडावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    
  अत्यावश्यक सेवा जसे रूग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, पॅथालाजीकल लॅबोरेटरी, जनावरांची दवाखाने व औषधी दुकाने, शेतीपूरक व्यवसाय, खते-बी बियाणे, किटकनाशक औषधी दुकाने, किराणा, भाजीपाला फळे, धान्य, दुध दुकाने, रेशन दुकाने केवळ निर्धारित वेळेतच चालू राहतील. घरोघरी, हातगाडीवर, फेरीवाल्यांद्वारे  भाजीपाला विक्रिसाठी  मुभा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना मास्क वापरणे तसेच किमान दिड मिटरचे आपापसात अंतर राखणे आवश्यक आहे.  सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध असून असे केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या सूचनांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे, अत्यंत निकडीचे कामासाठीच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच निकडीचे कामासाठी घराबाहेर जायचे असल्यास वाहनाचा वापर टाळावा. जीवनावश्यक वस्तू घरपोहोच उपलब्ध होण्याची सुविधा नागरिकांनी जास्तीत जास्त वापरावी,साथ रोग कायदा,1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतूदींचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा भारतीय दंड संहितेतील कलमान्वये  फौजदारी  कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच केशरी शिधापत्रकिाधारकांना सवलतीच्या दरात धान्यपुरवठा करण्यात येणार आहे, कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरजू लाभार्थींना अन्नधान्य मिळण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांनासुध्दा मे व जून,2020 साठी गहू व तांदुळ वितरीत करण्यात येणार आहे.  प्रतिमाह प्रतिव्यक्ती  8 रुपये किलो दराने 3 किलेा गहू आणि प्रतिमाह प्रतिव्यक्ती 12 रुपये किलो दराने 2 किलो तादूळ वितरीत करण्यात येणार आहे    केशरी शिधापत्रिकाधारक शिधापत्रिका घेऊन आल्यावर स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकेवरील व्यक्ती संख्या तपासून देय असलेल्या धान्याच्या परिमाणाची शिधापत्रिकेच्या मागील पानावर शिक्का मारुन नोंद घ्यावी लागणार आहे. शिधापत्रिकाधारकाला धान्य वितरण केल्यानंतर विहित नमुन्यातील नोंदवहीमध्ये नोंदी अद्ययावत करण्यात याव्यात. धान्य वाटप पूर्ण झाल्यानंतर दैनंदिन प्राप्त धान्य, धान्याची विक्री, शिल्लक साठा याबाबतचा गोषवारा नोंदवहीत घेणे आवश्यक आहे. 

      गांवपातळीवरील क्षेत्रीय अधिकारी तसेच पालक अधिकारी यांनी दररोज याबाबत‍ प्रत्यक्ष पाहणी करुन धान्य साठात प्रत्यक्ष मोजून नोंदवहीत स्वाक्षरी करावी. कोणताही लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, तसेच लाभार्थ्यांच्या तक्रारींचे तेथेच निराकरण होईल याची दक्षता क्षेत्रीय अधिकारी व पालक अधिकारी यांनी घ्यावी. धान्य वाटपाबाबत गांवामध्ये, स्थानिक पातळीवर जनजागृती करण्यात यावी. केशरी शिधा पत्रिकाधारकांना देय असलेल्या धान्याचा पुरवठा लवकरच करण्यात येणार असून धान्य प्राप्त झाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात यावे. सदरील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. यामध्ये हयगय अथवा टाळाटाळा केल्यास जीवनावश्यक वस्तू  अधिनियम,1955 नैसर्गिक आपत्ती अधिनियम 2005 अन्वये संबधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.असे राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी  सांगितले.
close