shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावळीविहीर येथील परमिट रूम फोडणाऱ्या आरोपींना न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर:

सावळीविहीर | प्रतिनिधी |
      
 शिर्डी जवळ सावळीविहीर येथील नगर-मनमाड महामार्गालगत असणारे हॉटेल बाबाज परमिट रूम चे शटर फोडून या हॉटेलमधील दारू चोरणारे सहा आरोपी  व त्यात आणखी एक महिला आरोपीला पकडण्यात आले असून असे एकूण सात आरोपी झाले आहेत. या प्रथम पकडलेल्या सहा आरोपींना आज न्यायालयात नेले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.या सहा आरोपींना नंतर उशिरा जामीनही मिळाल्याचे समजते.




        राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील नगर मनमाड महामार्ग लगत असणारे हॉटेल बाबाज परमिट रूम हे लॉक डाऊन मुळे बंद होते.याचाच फायदा घेत काही चोरट्यांनी ह्या हॉटेल चे शटर तोडून या हॉटेलमधील सुमारे एक लाख सात हजार 840 रुपयाची देशी-विदेशी दारू, बियर चोरून नेली होत. अशा काही आरोपींना पोलिसांनी तातडीने हालचाली करून पकडले, त्यामध्ये महेश नारायण कापसे, विशाल अशोक आगलावे, आशिष बबन शेलार, भोलेनाथ विजय चंदनकर, तसेच  चोरीची दारू घेणारे व दाम दुप्पट किमतीला विकणारे मनोज विश्वनाथ वाघ व विजय भानुदास चव्हाण यांना पोलिसांनी अटक  करून त्यांच्याकडून पोलिसांनी तीन मोटारसायकली व दहा हजार रुपयाची दारू ही ही विविध ठिकाणाहून जप्त केली होती.या सहा जणांना आज दि,२१पर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती.आज दि.२१ला त्यांना न्यायालयात नेले असता या आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. शिवाय या दारू चोरीप्रकरणी या 6 आरोपीबरोबरच सोनी विनोद जाधव या महिला आरोपीलाही ही पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला आरोपी सावळीविहीर चीच आहे. या चोरी प्रकरणाचा तपास एपीआय रूपवते करीत आहेत.यात आतापर्यंत सात आरोपी झाले असून अजूनही काही चोरीची दारू घेणारे बाहेर फिरत असल्याची चर्चा शिर्डी व परिसरात होत आहे. त्यांची कसून चौकशी व्हावी व यात चोरी प्रकरणात आणखी कोण कोण आहे याचा तपास करावा व त्यांच्यावर कारवाई व्हावी. अशी मागणी शिर्डी व परिसरातून होत आहे.सध्या शिर्डी व परिसरात दारूचे हॉटेल फोडण्याचे प्रकार वाढले आहेत.यावर त्वरित आळा बसावा.यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
close