इंदापूर (पुणे) : प्रतिनिधी :
येत्या २५ एप्रिलपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. भारतातील २० कोटी मुस्लिमांबरोबरच जगभरातील तब्बल २०० कोटींच्या आसपास मुस्लिम या महिन्यात उपवास, तरावीह (सामूहिक नमाज पठण), सामूहिक इफ्तारसाठी (उपवास सोडण्यासाठी) मस्जिदींमध्ये एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा महिना साजरा करीत असतात. मात्र सध्या देशात कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून यंदा मुस्लिम समाजाला व्यक्तिगत पातळीवर आपल्या घरातच हा महिना साजरा करावा लागणार आहे.
घरातच राहून पवित्र रमजान साजरा करण्याचे आदेश देण्याबाबत भारत सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य शासनाला १६ एप्रिल रोजी सूचनाही दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शासकीय स्तरावर तसे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दि.१४ मार्च, २०२० पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ व संदर्भातील भारतीय दंडसंहिता कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत वारंवार निर्देश देखील दिलेले आहेत. येत्या २५ एप्रिलपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे.
रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जिदींमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील लोक नमाज, तरावीह (सामूहिक नमाज) व इफ्तार अर्थात उपवास सोडण्यासाठी एकत्र येतात. मात्र सद्य:स्थिती विचारात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर होण्याची शक्यता आहे व त्यामधून मोठया प्रमाणावर जिवितहानी होण्याचा धोका आहे.
यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज टाळणे मुस्लीम बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे असल्याने सार्वजनिकरित्या मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवानी एकत्र येऊन नमाज पठण न करणे हितावह ठरणार आहे.
भारत सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने देखील दि.१६.०४.२०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरसद्वारे निर्देश देताना राज्यातील सर्व मुस्लीम बांधवांना खालीलप्रमाणे सूचना राज्य शासनाने आपल्या स्तरावर द्याव्यात असे आदेश दिलेले आहेत.
१) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे (सोशल डिस्टन्स) पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे.
२) कोणत्याही परिस्थितीत मस्जिदींमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.
३) घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये.
४) मोकळया मैदानावर एकत्र जमा होऊन नियमित नमाज पठण, इफ्तार करण्यात येऊ नये.
५) कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटूंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.
६) सर्व मुस्लीम बांधवानी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे.
७) लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
धार्मिक कार्यक्रम असो वा सांस्कृतिक, सामूहिक असो वा व्यक्तिगत सर्वच स्तरावर मुस्लिम समाज नेहमीच कायद्याच्या चौकटीत राहून ते पार पाडण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र उपरोक्त सूचनांचे तंतोतंत पालन होण्यासाठी जनजागृतीही तेवढीच महत्वाची आहे. यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाने राज् य शासनाकडे मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करावी अशी विनंती देखील केली आहे.