shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील जेष्ठ संपादक , पत्रकार व वृत्तपत्रांचा कृतज्ञता सन्मान सोहळा.



    महाराष्ट्राला पत्रकारितेची फार मोठी परंपरा लाभली आहे. अनेक वृत्तपत्रांनी समाज परिवर्तनासाठी संघर्ष लढे दिले आहेत. पत्रकारिता हे सेवेचे व प्रबोधनाचे साधन म्हणून वर्षानुवर्षे जनतेची सेवा करणाऱ्या जेष्ठ संपादक पत्रकार व वृत्तपत्रांचा कृतज्ञता सन्मान संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र , मुंबई  या संस्थेने करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील थोर व दिवंगत संपादक व पत्रकारांच्या नावाने हे कृतज्ञता सन्मान केले जाणार आहेत.महाराष्ट्रातील महसूल विभागानुसार प्रत्येक विभागातील पात्र निकषा नुसार हे कृतज्ञता सन्मान सोहळे होणार असल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे व राज्य प्रकल्प प्रमुख प्रकाश भंडारे यांनी दिली आहे.



प्रत्येक महसूल विभागातील वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारे व किमान २५ वर्षे पत्रकारिता केलेल्या संपादक, पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे  नियमित प्रकाशनाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांच्या संपादक , मालक ,  छायाचित्रकार , व्यंगचित्रकार , प्रतिनिधींचा सन्मान या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील अनेक संपादक - पत्रकार आयुष्यभर पत्रकारितेत , सामाजिक सेवेत असतात मात्र त्यांच्या या कार्याचा सन्मान होतोच असे नाही. संपादक व पत्रकार सेवा संघ  महाराष्ट्र , मुंबई हि संस्था सामाजिक कृतज्ञता भावनेतून हे सन्मान करणार आहे. कृतज्ञता सन्मान सोहोळा  निकषास पात्र असणाऱ्या संपादकांनी त्यांची माहिती १ मे २०२० पर्यंत पोस्टाने अथवा इ-मेल वर पाठवावी.माहिती पाठवताना संपादक - पत्रकारांचा फोटो , अल्प परिचय संबंधीत वृत्तपत्राच्या २ प्रति पाठवाव्यात. ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी किंवा १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिनी हे कृतज्ञता सन्मान सोहोळे आयोजित करण्याचे नियोजन आहे. रोख रक्कम , सन्मानपत्र , महावस्त्र , स्मृतीचिन्ह या प्रकारचे सन्मान स्वरूप आहे.

सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारितेत कार्यरत असणाऱ्या ५०-६० वयोगटातील संपादक - पत्रकारांनी त्यांच्या विभागातील जेष्ठ संपादक - पत्रकारांच्या शिफारसी केल्यास त्या स्विकारल्या जातील.

संस्थेच्या जिल्हा निहाय पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास विस्तृत प्रसिद्धी देऊन जिल्ह्यातील पात्र सन्मान मूर्तींची माहिती खालील पत्त्यावर पाठवावी परीक्षण मंडळाच्या निकषातून निवड झालेल्या सन्मान मूर्तींची नावे अखेर पर्यंत जाहीर केली जातील.

माहिती पाठविण्यासाठी पत्ता -
मा.अध्यक्ष,
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र,मुंबई
द्वारा - दैनिक युवावार्ता कार्यालय,संगमनेर ४२२६०५ जि- अ.नगर

इ-मेल
mahasevasangh@gmail.com / dailyyuvavarta@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------------
प्रकाश भंडारे 

राज्य प्रकल्प प्रमुख - ९४२३१७९०२८/ ०२४१- २४२८४१५         
७, पत्रकार वसाहत , सिव्हिल हॉस्पिटल जवळ                
 नगर मनमाड रस्ता सावेडी,अ.नगर  - ४१४००३
----------------------------------------------------------
किसन भाऊ हासे  
अध्यक्ष 
संपादक व पत्रकार सेवासंघ महाराष्ट्र,मुंबई  
द्वारा - दै.युवावार्ता कार्यालय, संगमनेर ४२२६०५
जि. - अ .नगर   
--
close