shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मानवता फाऊंडेनच्या वतीने मास्कचे वाटप.

सावळीविहीर | राजकुमार गडकरी।
देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, कोरोना मुळे सर्वत्र मोठे संकट परिस्थिती निर्माण झाले आहे अशा परिस्थितीत डॉक्टर आरोग्य कर्मचारी  पोलीस,व सर्वच शासकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत आहेत, समाजसेवा करताहेत, अशा  शिर्डी व परिसरातील सर्वांना मानवता फाउंडेशनच्या वतीने नुकतेच चांगल्या दर्जाचे मास्क वाटप करण्यात आले,



 मानवता फाउंडेशन नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असते ,सध्या तर कोरोना मुळे सर्वत्र आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत चांगल्या दर्जाचे मास्क ही अशा संकटसमयी सेवा करणाऱ्यांना पुरवणे महत्त्वाचे आहे, हे जाणूनच मानवतेच्या दृष्टिकोनातून मानवता फाउंडेशनने शिर्डी संस्थांनमधील सुरक्षाव्यवस्थेत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना, शिर्डी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांना व आरोग्य सहाय्यक (आशा) तसेच शिर्डी परिसरातील सावळीविहीर बुद्रुक ,सावळीविहिर खुर्द निमगाव ,निघोज  अधिक गावातील  ग्रामपंचायत कर्मचारी , त्याचप्रमाणे राहता तालुक्यातील अंगणवाडी सेविका,  मदतनीस  व सर्व अाशा( आरोग्य सहायिका) यांना   मानवता फाउंडेशन शिर्डी- सावळीविहीर च्या वतीने चांगल्या दर्जाचे मास्क वाटप नुकतेच करण्यात आले,

 सध्या देशात राज्यात, कोरोनाने मोठे संकट निर्माण केले आहे, दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढतच आहेत, मुंबई ,पुण्यानंतर इतर जिल्ह्यातही व आता श्रीरामपूर ,संगमनेर , कोपरगाव लाही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यांची संख्या अल्प असली तरी  ग्रामीण भागात  त्यामुळे मोठी दक्षता घेण्यात येत आहे , देशात लॉकडाऊन आहे, राज्यातही सर्व बंद आहे,  या पार्श्वभूमीवर शिर्डी  व परिसरात सर्वत्र  अत्यावश्यक सेवा सोडून सर्व कडकडीत बंद आहे ,विशेष म्हणजे 17 मार्च 20 20  दुपारी तीन वाजेपासून श्री साई संस्थानने श्री साईबाबा समाधी मंदिर व आपले संस्थांचे निवासस्थाने व प्रसादालय हे बंद केले आहेत, शिर्डीत बस ,रेल्वे, विमानसेवाही बंद आहेत सर्वकाही ठप्प आहे ,असे असताना श्री साईबाबा संस्थान मध्ये सुरक्षेचे काम करणारे पोलिस कर्मचारी ,शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ,पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी , अंगणवाडी सेविका व मदतनीस व सर्व आरोग्य सेविका ,आशा ताई या मात्र आपल्या कामात तैनात आहेत, ड्युटीवर येताना ,जाताना, आपले काम करताना कोणाशी संपर्क येऊ शकतो ,त्याचप्रमाणे येथील डॉक्टर ,नर्स ,आरोग्यसेविका, आपल्या परीने सेवा करीत आहेत, आपला जीव धोक्यात घालून  आरोग्य सेवा करण्यासाठी  त्या रात्रंदिवस झटत आहेत ,त्यांना चांगल्या ,उत्तम दर्जाचे मास्क ची मोठी आवश्यकता होती,  चांगल्या दर्जाचे मास्क या लोकांना  गरजेचे असल्याने राहता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी तशी मानवता फाउंडेशन ला विनंती  केली होती ,या विनंतीला मान देत व सध्याची गरज लक्षात घेऊन मानवता फाउंडेशनने( सावळीविहीर- शिर्डी )यांच्यावतीने आरोग्य सेविका ,आशा व संस्थानचे पोलीस कर्मचारी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी  व राहाता तालुक्यातील  सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस  आरोग्य सेविका  आशा ताई यांना नुकतेच नियम व दक्षता पाळत चांगल्या दर्जाचे मास्क वाटप करण्यात आले, या उपक्रमाबद्दल मानवता फाऊंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे, आतापर्यंत मानवता फाउंडेशन असे विविध सामाजिक उपक्रम राबवले असल्याचे मानवता फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन बाराहाते यांनी सांगितले, 

यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनय गिरी, सचिव श्री. मोसीन शेख, खजिनदार अशोक गाडेकर, 
सौ. छायाताई देशपांडे,   डॉ. प्रदीप केंद्रे, डॉ. अनंतकुमार भांगे, डॉ. वृषाली लोखंडे, API नयना आगलावे, सौ. निलोफर शेख, ऍड. राजेश कातोरे, डॉ. सुभाष खकाळे, डॉ. किरण भोईटे, मनोज हजारे, सचिन काळोखे, सचिन शिरोळे, बाबा डांगे, विशाल गोसावी, गिरीश क्षीरसागर, श्री. चंदू बोरसे, दिलीप भारुड, महेश चव्हाण, निलेश उगले, महेश आगलावे, योगेश जपे, श्री. संतोष तांबे, नितीन पठारे, योगेश जपे आदींसह सदस्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
close