shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनामध्ये पत्रकाराची महत्वाची भूमिका.

     कोरोनामध्ये पत्रकाराची महत्वाची भूमिका असून सुध्दा तो याबाबत दुर्लक्षित राहिला असे वाटते. लॉकडाऊन झाल्यापासून ते आजपर्यंत तो आपला जीव धोक्यात टाकून वृत्तसंकलन करून प्रत्येक घडामोडी आपल्या मोबाईल मार्फत तो सोशल मिडियाने आपल्या पर्यन्त देत आहे. रोज ई-पेपर आणि बातम्याचे पोर्टल घरातच राहून आपल्या मोबाईलवर बित्तबातमीची अपडेट माहिती देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.



      असे असताना हा महत्वाचा घटक असूनही केवळ आरोग्य विभाग, पोलीस, आणि सहकार्य करणारे  सर्व यांना सगळ्यांनी समाजातील महत्वाचा घटक समजून पत्रकारानीच प्रसिध्दी दिली. त्यांचे काम सुध्दा धोका पत्करून मोठे धैर्याचे आहे यात कोणतेही दुमत नाही. 
मला याबाबत कोणतीही तक्रार किंवा कुणाला  दोष देण्याचा हेतू नाही. कारण कोरोना हा महाभयंकर विषाणू  राक्षसाला कोणताही आकार नाही. सूक्ष्म जीवाणूच्या माध्यमातून तो मानवी शरीरात प्रवेश करतो आणि एका पासून दुसऱ्यात संपर्कात जाऊन त्याची प्रजनन क्रिया वाढते. या वेळी संपूर्ण जगात या कोरोनाचे थैमान सूरू आहे. अमेरिका, इटली, फ्रान्स, सारखे बलाढ्य देश याला शरणं गेले आहेत.दिवसेंदिवस मृत्युचा आकडा हा वाढतच चालला आहे.


      आपला देश, आपले सरकार मोठ्या ताकदीने व विश्वासाने या कोरोना राक्षसाशी लढा देत आहे. भारतीय नागरीक म्हणुन संपूर्ण देश या लढ्यात झुंज देत आहे . 
या लढ्यात आपण सर्व एका ठिकाणी शांत बसून व सरकारी नियमाचे तंतोतंत पालन करून राक्षसाला नामोहरम करायचे आहे.

     आज जवळ जवळ 25/30 दिवस झाले आहेत.  लॉक डाऊन करून एका ठिकाणी राहून लहान मुले सहीत सगळेजण पूर्णपणे वैतागून गेली आहेत. 

      लाइफ लाईन असणारी धावती मुंबई आता शांत झाली आहे. नेहमीच गजबजलेला आपला भारत देश एकदम शांत झाला असून  देशातील एकशे तीस कोटी जनता भयभीत होऊन शांत झाली आहे. सगळीकडे स्मशान शांतता पसरली आहे.

     दुसरीकडे बळीराजा शेतकरी हाताशी आलेली पीक आपल्या डोळ्यासमोर नाश होताना बघत आहे.
अर्थ व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. प्रशासन, आरोग्य, पोलिस, डॉक्टर, नर्स आणि कोविड योद्धा हे रात्रंदिवस या राक्षसासोबत लढा देत आहेत. पण या सगळ्याना प्रसिध्दी देणारा पत्रकार मात्र अलिप्त आहे. हे माझ्यासहीत सगळ्यांना जाणवत असेल.

     काही पत्रकाराना पण याची लागण झाली पण ती जास्त लोकांसमोर मांडली नाही. ही व्यथा मांडण्याचा हेतू एव्हढाच की आम्हीही प्रशासन, आरोग्य, पोलिस, डॉक्टर, नर्स आणि कोविड योद्धा प्रमाणे या कोरोनाला तितक्याच हिम्मतीने लढा देत आहोत.  

     कारण ...आपल्याला सरकारने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करून कोरोनाची लढाई जिंकायची आहे ..

जय हिंद.   जय महाराष्ट्र । । ! ! 

अरूण ठोंबरे संपादक श्री साम्राज्य
ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती

9322107521/9527154112
close