अंबरनाथ | प्रतिनिधी | जाफर वणू
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने जगात व देशात धुमाकुळ घातला असून सरकारने लॉकडाउन केले आहे. याच बरोबर लॉकडाउन असल्यामुळे घरात थांबलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्यामुळे आलेल्या उपासमारिचे सावट लक्षात येताच मा. मंत्री बच्चू भाऊ कडु यांच्या नेतृत्वाखाली व प्रहार जनशक्ति पक्ष अंबरनाथ अध्यक्ष प्रितम शिसोदे यांच्या मार्गदशनाखाली सौ. ज्योती गोपाल शिसोदे यांच्यासह सर्व कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमान यांच्या हस्ते अंबरनाथ पूर्वेकडील परिसरात महालक्ष्मी नगर, गॅस गोडाऊन, दुर्गामाता मंदिर टेकड़ी आणि शिवमंदिर परिसरामधील गरजु लोकांना, कामगार, सर्वसामान्य बेरोजगार नागरिकांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तु म्हणजेच गहु, तांदुळ, कांदे, साखर, तुरडाल, मटकी व इतर सर्व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आला असून हा उपक्रम गेल्या 5 दिवसांपासून चालू आहे.
कोरोना सारख्या महाभयंकर विषाणुला हद्दपार करण्याकरिता चांगलाच संकल्प प्रहार जनशक्ति पक्ष अंबरनाथ अध्यक्ष प्रितम शिसोदे आणि सौ. ज्योती गोपाल शिसोदे यांच्याकडून राबविण्यात आला.
त्याचप्रमाणे वार्ड क्र. 43 या विभागात कोरोना वायरसला कसा रोखावा याबाबत जन जागृती केली. या प्रकारे ते नेहमीच समाजकार्य करून ते लोकांचे समस्या सोडविनण्याचे कार्य करीत असतात. तसेच कुणीही घराबाहेर पडू नका, घरातच रहा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश प्रहार जनशक्ति पक्ष अंबरनाथ अध्यक्ष प्रितम शिसोदे आणि सौ. ज्योती गोपाल शिसोदे यांच्याकडून देण्यात आला आणि नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.


