shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना व लॉक डाऊनमुळे सर्व कलाकारांची दयनीय अवस्था : रमेश कांबळे पन्हाळा ता.संघर्ष बहुजनसेना प्रमुख .



पुनाळ | प्रतिनिधी |

      महाराष्ट्रामध्ये ग्रामिण व शहरी भागामध्ये लोककलारांची संख्या जास्त आहे. पण सध्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी , लॉक डाऊन लागू केल्याने विविध क्षेत्रातील( तमाशा, ऑकेस्ट्रा, शाहिरी,बॅन्ड,जोगती , सोंगी भजन ,अन्य) या सर्व लोक कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या वर्षी लोकसभेच्या आचार संहिता असल्यामुळे सर्व कार्यक्रम वेळे अभावी रद्द करण्यात आले होते. त्यांचा फटका सर्व कार्यक्रमावर झाला. त्या नंतर ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापूरामुळे घरातील होत नव्हतं ते पण पूरामुळे वाहुन गेलं. कठिण परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर आशा होती नविन हंगामाची.परंतु  हंगाम सुरूवात होण्यापुर्वी कोरोनाच्या संसर्ग रोगामुळे घोषित केलेल्या सर्वत्र कर्फ्यू सदृश परिस्थितीमुळे विविध क्षेत्रातील (तमाशा , ऑकेस्ट्रा,शाहिरी, सोंगी भजन ) कार्यक्रमांना प्रशासनाने स्थगिती  दिल्यामुळे कोणतेही कार्यक्रम करता आले नाही.त्यामुळे लोककलेवर जीवन असणाऱ्या सर्व कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ येऊन दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.आज शिर्डी एक्सप्रेसच्या प्रतिनिधीशी संघर्ष बहुजन सेनेचे तालुका प्रमुख रमेश कांबळे यांनी कलाकारांच्या व्यथा मांडल्या.
       


  
लोककला जिवंत ठेवायची असेल तर सरकारने  गांभिर्याने विचार करून. आमची  सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र विभागामार्फत प्रत्येक जिल्हा मध्ये लोककलाकार समिती नेमून डायरेक्ट बेनेफिट योजनेव्दारे त्यांच्या बॅक खात्यांमध्ये  पुरेशी रक्कम जमा करावी हि नम्र विनंती.

            कळावे.
संघर्ष बहुजन सेना महाराष्ट्र .सचिव, कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ कोल्हापूर पन्हाळा तालुकाध्यक्ष ...मा .रमेश कांबळे ( सातार्डेकर)  

     हंगामामध्ये पुर्ण वर्षाचे नियोजन लोक कलाकार करत असतात. सध्या त्यांच्यापुढ जगायचं कसं ,वाढती महागाई,मुलांचे शिक्षण,आरोग्य,भाड्याचे घर विविध प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होऊ लागले आहेत.कसा ताळमेळ बसवायचा पुढील हंगामा पर्यंत असा मोठा प्रश्न तमाम महाराष्ट्रातील लोककलाकाराला पडलाय..?                    
close