shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोतवाल कोरोना संरक्षण कवच पासुन वंचित.



पुनाळ | प्रतिनिधी(सुरेश वडर ):
       देशात महाभयानक कोरोना व्हायरसचा चाललेला धुमाकुळ यामुळे देशभरातील जनतेला या रोगाची लागन होवुन अनेकजण मृत्यूच्या खाईत लोटले गेले आहेत. हे शमवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने लाॅकडाऊन ही सिस्टीम राबवली आहे, तसेच परदेशातुन व देशाअंतर्गत आलेल्या लोकांना कोरोनाची तपासणी करुन होम कोरांटाईन ही संकल्पना अतिशय युध्द पातळीवर सुरु आहे. या उपक्रमामध्ये तलाठी,ग्रामसेवक, कृषी अधिकारी,कोतवाल,पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका,अशा स्वयं सेविका,आरोग्य अधिकारी यासह विविध क्षेत्रातील ग्राम पातळीवरील कोरोना समितीचे सदस्य आहोरात्र काम करत आहेत.स्वतःचा जिव धोक्यात घालुन महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी,अगंणवाडी सेविका,आशावर्कर्स यांना कोरोना सुरक्षा कवच या अंतर्गत  90 दिवसांचा आरोग्य विमा व निर्वाह भत्ता तसेच विविध सुविधा मा.ग्राम विकासमंत्री ना.हसन मुश्रीफ साहेबांनी जाहीर केले आहे.पण या कार्यक्रमांतर्गत कोतवालांना काहीच दिलेले नाही .बहुदा शासनाला कोतवालांचा विसर पडला की काय असा नाराजीचा सुर राज्यभरातील कोतवाल बंधू-भगीनींच्या गोठातुन उमटला आहे.


कोतवाल प्रत्येकाच्या घरी,आधिकारी निवांत:-  शासनाने कोरोना बाबत काही माहीती तात्काळ पाठवण्यास सांगितले की,अधिकारी वर्ग हा बहुदा शहराच्या भागात राहात असतात, ते तेथुनच कोतवालाला फोनवरुन माहिती विचारतात.ती माहीती संकलन करण्यासाठी कोतवाल सर्व ठिकाणी जात असतो. स्वतःचा जिव धोक्यात घालुन माहीती संकलन करतो. श्रेय मात्र अधिकारी वर्ग घेत असतात हीच खरी शोकांतिका आहे.

     कोतवाल बंधु भगिनीं कोरोना व्हायरस कोव्हिड-19 या  महामारी संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी,मा.
उपविभागीय अधिकारी ,मा.तहसीलदार,मा.
मंडळ अधिकारी तसेच मा.गावकामगार तलाठी यांचे व शासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेला आदेशाचे तंतोतंत पालन करून गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण संचारबंदी आदेशाचे पालन करणे साठी गावी दंवडी देवून  रात्रंदिवस झटत आहोत.तसेच आपअपल्या जिल्हयामध्ये होम क़्वारनंटाईन नागरिकांना,कुंटुबाना शाळा क़ॉलेज अशा ठिकाणी त्यांना चहा-नाश्ता , जेवण,आरोग्य बाबत,त्याठिकाणी राहण्याची सोय तसेच गावात लोकप्रतिनिधीना सोबत घेऊन गावा गावात जंतूनाशक फवारणी तसेच प्रदेश दौरा करून आलेल्या लोकांची माहिती सर्व प्रथम आम्ही कोतवाल बंधु भगिनींनी प्रशासनास दिली आहे. तसेच निवडणुका,महापुर , महसुल गोळा करणे,शासकीय नोटीसा बजावने,गौण खनिज वाहतूक रोखने व जगाचा पोशिन्दा असणा-या शेतकरी वर्गाला मदतीसाठी शासनाने दिलेल्या प्रत्येक योजनांची माहिती तळागळा पर्यंत पोहचवने ही काम गेली अनेक वर्ष झाली आम्ही ईमाने इतबारे करत आहोत पण खेदाची बाब म्हणजे 
आमचे वरिष्ठ अधिकारी कोतवाल म्हणजे काय काम करतो ही वस्तुस्थिती कदाचित शासना पर्यंत पोहचू देत नसतील. फक्त आपल्या सोयीनुसार प्रत्येक 
कामाच्या निपटारा गोड बोलुन अधिकारी करत असतात.


close