पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकार बंधू भगिनींची कोरोना प्रतिबंध तपासणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी महापलिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे दिवस रात्री आपले जीव धोक्यात घालून जनतेला सत्य परस्थिती कळविण्यासाठी पत्रकार बांधव-भगिनी चॅनेलवर काम करणारे कॅमेरामन, फोटोग्राफर यांना कोरोनाची ‘पॉझिटिव्ह’ लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातही मोठ्या संख्येने पत्रकार कार्यरत आहेत. या सर्वांची कोरोनाची तपासणी करून त्यांना योग्य ते सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी सुलभा उबाळे यांनी केली आहे.