येवला | प्रतिनिधी-(संतोष राऊळ):
कोरोना या आजाराशी लढण्यासाठी वेळोवेळी शासनाने संपूर्ण देशासह प्रत्येक राज्यात खबरदारी म्हणून मास्क वापरणे, सॅनिटायझर ने हात स्वच्छ धुणे तसेच सोशल डिस्टन्स पाळणे हे वेळोवेळी सांगितले आहे.कोरोना या आजारावर लवकर मात करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपणास लोक प्रयत्न करताना दिसतात याचाच विशेष प्रत्यय येवला येथील बँक ऑफ इंडिया च्या शाखेत प्रकर्षाने पहायला मिळाले. राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून बँक ऑफ इंडिया च्या येवला शाखेत ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विशिष्ट रंगांचा वापर करून विशेष आखणी केली आहे.
तसेच शाखेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वछतेसाठी सॅनिटायझर ठेवले आहे. बँकेचे ब्रॅन्च मँनेजर विकास सोनवणे यांच्या मार्गदर्शनात बँक अधिकारी विनोद मुजमुले हे माईक वरून ग्राहकांना आवश्यक त्या सूचना व मदत करतात. अशाच पध्दतीने प्रत्येक बँकेने आणि लाभार्थांनी नियम पाळले तर कोरोना या वैश्विक महामारीवर लवकरच विजय मिळवू शकू असा विश्वास ग्राहक देखील व्यक्त करताना दिसतात.येथील कर्मचारी नंदू जाधव व हर्षद आहिरे हे विशेष परिश्रम करून ग्राहकांना सहकार्य करतात.