shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी- चिंचवड चे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या गाईला झालायं ‘कोविड’..!




  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जन्मलेल्या वासराचे अजब नामकरण.


पिंपरी- संपूर्ण जगभर कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातही अभूतपूर्व लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काळेवाडीत माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला. तापकीर कुटुंबियांनी या वासराचे नाव ‘कोविड’ ठेवले असून गंमत म्हणजे आज संपूर्ण जग हे नाव उच्चारण्यासही दचकत आहे.



मच्छिंद्र तापकीर यांच्या गोठ्यातील मनु नावाच्या गाईने सोमवारी (दि.१३ एप्रिल) सायंकाळी एका गोंडस वासराला जन्म दिला. विशेष म्हणजे त्याच्या जन्मानंतर गाईने या पिल्लाच्या जवळपासही कोणाला फिरकू दिलेले नाही. सध्या जगभर कोविड व कोरोना या नावाचीच चर्चा असल्याने तापकीर यांनीही आपल्या या वासराचे नावदेखील ‘कोविड’ असे ठेवले आहे.

यासंदर्भात बोलताना मच्छिंद्र तापकीर म्हणाले की, सध्या सगळीकडे कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूचीच धास्ती असून या कोरोनामुळे माणूसही माणसापासून दूर झालेला आहे. या लॉकडाऊनच्या दिवसांच्या आणि कोरोनाच्या आठवणी पुढील अनेक वर्षे माणसांच्या मनात राहतील. आमच्या मनु नावाच्या गाईने वासराला जन्म दिल्यानंतर या वासराचे नामकरण काहीतरी वेगळे करण्याचा आमचा मानस होता. त्यामुळे या वासराचे सध्या जगभर चर्चा असलेले ‘कोविड’ असे नामकरण करण्यात आल्याचे तापकीर यांनी यावेळी सांगितले.
close