बदलापुर / जाफर वणू :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात संचारबंदी तसेच लॉकडाऊन असल्याने अंबरनाथ शहरात वडवली विभागात एक दिवस आड पाणी पुरवठा दिनांक १७ मार्च पासून करण्यात येत आहे. परंतु कोरॉनाच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आड पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याचे लक्षात येताच मनसे माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्वप्निल बागुल व उप शहराध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी उप अभियंता, म.जी.प्रा.ज.व्य. उपविभाग, अंबरनाथ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली.
या निवेदनात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औद्योगिक क्षेत्रातील बहुतांश कंपन्या बंद ठेवण्यात आले असून या सर्व कंपन्यांना पाणी पुरवठा एम आय डी सी बारवी धरण येथून होत आहे. सध्या बहुतांश औद्योगिक क्षेत्र कार्यन्वित नसल्याने त्या सर्व कपन्यांना पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे आपण एम.आय.डी.सी. कार्यालय ह्यांना संपर्क साधुन सदरच्या भागाला (एरव्ही) जाणारे पाणी रहिवासी भागासाठी देण्यात यावे. जेणे करून अंबरनाथ पूर्व भागातील बऱ्याच ठिकाणी एक दिवस आड पाणी पुरवठा होत असून तो पाणी पुरवठा लोकांना अपुरा पडत असल्याने कोरोनासारख्या वायरसमुळे स्वच्छेतेची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते. त्याकरीता नागरिकांना पाण्याची जास्तीत जास्त गरज भासते आणि अंबरनाथ पूर्वे विभागात एक दिवस आड़ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात म.जी.प्रा.ज.व्य. उपविभाग अंबरनाथ यांच्याकडे पूर्वेकडील भागात एक दिवस आड़ बंद करण्यात येत असलेला पाणी पुरवठा दररोज चालू ठेवण्यात यावा. याकरिता लेखी निवेदन मनसे माजी नगरसेवक तथा माजी सभापती स्वप्निल बागुल व उप शहराध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी दिले आहे.