shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथमध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान व वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून गरजु लोकांना व बेरोजगारांना जेवणाचे तसेच अन्न धान्यचे वाटप.

अंबरनाथ | प्रतिनिधी | जाफर वणू :

       कोरोना वायरससारख्या भयंकर रोगाने जगात व देशात धुमाकुळ घातला असून सरकारने 25 मार्च पासून लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊन काळात घरात असलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्याने उपासमारिचे सावट लक्षात येताच वंचित बहुजन आघाडी राष्टीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ पूर्व वंचित बहुजन आघाडी युवा नेते तथा शिवराय फुले शाहु आंबेडकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रविण संदीप गोसावी व जनसेवक सर्व सामान्य लोकांचा बुलंद आवाज तथा शिल्पकार मित्र मंडळ चे नितीन भाऊ इंनकार यांच्या मार्गदशनाखाली उमेश मोरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने या कोरोना लॉकडाउनच्या काळात गेल्या 1 एप्रिलपासून अंबरनाथ शहरातील परिसरात गोरगरीब व गरजु नागरिकांना एकवेळाचे जेवन तसेच अन्न धान्य आजपर्यत पुरविण्यात आले. तसेच या वाटपात सोशल डिस्टेन्सचा वापरही ठेवण्यात आला असून शहरातील गोर गरीब मजूर लोकांना सुद्धा आपण दैनंदिन जेवण वाटप करतो. 



त्याच बरोबर उपक्रमास अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी यांनी सहकार्य दिले की, आपण कश्या प्रकारे जेवण वाटप करता हे पाहण्यासाठी आले होते. तसेच त्यांनी कोरोना विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. हा लॉकडाउन सर्व साधारणतः 14 एप्रिल पर्यत चालू राहिल अशी अपेक्षा होती. परंतु जेव्हा हा लॉकडाउन 3 में पर्यत किंवा पुढील आदेश होईपर्यंत सुरु असणार आहे. याच बरोबर आपल्या स्वखर्चाने अत्यावश्यक रुग्णांकरिता एंबुलन्सची सुद्धा सेवा आपण देत आहे. तसेच हा जेवण वाटपाचा आपला संकल्प 3 मे पर्यंत चालू असणार आहे.

त्याचप्रमाणे अंबरनाथ परिसरात कोरोना वायरसला कसा रोखावा याबाबत जन जागृती केली. या प्रकारे ते नेहमीच समाजकार्य करून ते लोकांचे समस्या सोडविण्याचे कार्य करीत असतात. तसेच कुणीही घराबाहेर पडू नका, घरातच रहा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. तसेच आपण या मोफत अन्नछत्राला मदत करण्यासाठी आपल्या परीने शक्य होईल तेवढे भाजीपाला, किराणा सामान किंवा रोख रक्कम देऊन जास्तीत जास्त प्रमाणात मदतीचा हात पुढे करुन वंचित बहुजन आघाडीचे मोफत अन्नछत्र मानवतेच्या नात्याने सुरु ठेवण्यासाठी सहकार्य करा. असा संदेश अंबरनाथ पूर्व वंचित बहुजन आघाडी युवा नेते तथा शिवराय फुले शाहु आंबेडकर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रविण संदीप गोसावी व जनसेवक सर्व सामान्य लोकांचा बुलंद आवाज तथा शिल्पकार मित्र मंडळ चे नितीन भाऊ इंनकार यांच्याकडून देण्यात आला आणि नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
close