shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथमध्ये डि.वाय.फाऊंडेशनचे अंबरनाथ तालुकाध्यक्ष अ‍ॅड.रोहन रसाळ यांच्याकडून आदिवासी कुटूंबांना व बेरोजगारांना जिवनावाश्यक वस्तुचे वाटप.



अंबरनाथ | प्रतिनिधी | जाफर वणू

     कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने जगात व देशात धुमाकुळ घातला असून सरकारने लाॅकडाऊन केले आहे. याच बरोबर लॉकडाउन असल्यामुळे घरात थांबलेल्या नागरिकांना कामधंदा नसल्यामुळे आलेल्या उपासमारिचे सावट लक्षात येताच अंबरनाथ पश्चिमेकडील परिसरात डि.वाय.फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरघे यांच्या मार्गदशनाखाली कामगार, आदिवासी, सर्वसामान्य बेरोजगार नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा बांधकाम समिती सभापती करुणा कृष्णा रसाळ पाटील यांच्या माध्यमातुन डि.वाय.फाऊंडेशन अंबरनाथ तालुकाध्यक्ष अ‍ॅड.रोहन रसाळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.



         तसेच काही दिवसांपुर्वी लाॅकडाऊन असल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनावर संक्रांतच आली होती. कोरोना सारख्या महाभयंकर विषाणुला हद्दपार करण्याकरिता चांगलाच संकल्प डि.वाय.फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष अॅड.रोहन रसाळ पाटील यांच्याकडून राबविण्यात आला.

        अंबरनाथ नगरपरिषदेच्या वार्ड क्र. ३ मधील सर्व सामान्य गरजू आदिवासी कुटूंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले यामध्ये तांदुळ, डाळ, तेल, कांदे, बटाटे, मसाला, हळद, मिठ, साबण इत्यादी जिवनावश्यक वस्तुंचा समावेश होता. त्याचप्रमाणे वार्ड क्र. 3 या विभागात कोरोना वायरसला कसा रोखावा याबाबत जन जागृती केली. या प्रकारे ते नेहमीच समाजकार्य करून ते लोकांचे समस्या सोडविनण्याचे कार्य करीत असतात. तसेच कुणीही घराबाहेर पडू नका, घरातच रहा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या असा संदेश डि.वाय.फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.रोहन रसाळ पाटील यांच्याकडून देण्यात आला आणि नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
close