shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाॅकडाऊन तोडणार्यावर आजपासून होणार दंडात्मक कारवाई..!!

सावळीविहीर । राजकुमार गडकरी । 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन  सुरू आहे. मात्र या लॉकडाऊन चे नियम न पाळता विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना आता थेट श्रीसाईबाबा  संस्थानच्या रुग्णवाहिकेत घालून त्यांची श्री साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्ये तपासणी करण्यात येत आहे व काहींकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम आज सकाळपासून दिवसभर शिर्डीत सुरू होती.अनेकांची नियम तोडल्यामुळे आरोग्य तपासणी झाली तसेच दंडही भरावा लागला.अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर शिर्डीत अनेक जण करा केळी, आंबे घेण्यासाठी बाहेर पडले होते.मात्र अशा लोकांवर कारवाई करण्यात आली. नियम सर्वांसाठी सारखेचआहेत.त्यामुळे यापुढेही अशी ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती नितीन गोकावे यांनी  दिली.




सध्या लॉकडाऊन सुरू आहे.मात्र अनेकजण विनाकारण शहरात फिरत असतात. सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने काही घराबाहेर पडतात. अशाकडूनही आता दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.तसेच शहरात विनाकारण फिरणारे पायी किंवा मोटरसायकलवर किंवा चारचाकी वाहन असणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.गाड्यांची कागदपत्र तपासणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेत आहे. त्यांचे कागदपत्र पाहून त्यांना सोडून देण्यात येते. परंतु जे विनाकारण फिरतात.त्यांना मात्र दंड करून साई संस्थान च्या रुग्णवाहिकेत घालून त्यांना श्रीसाईबाबा हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.यामुळे शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्यावर आळा बसेल, विनाकारण आरोग्य तपासणी होत असल्या कारणामुळे लोक विनाकारण बाहेर फिरणार नाहीत, विनाकारण बाहेर दिसल्यास अशी कारवाई करण्यात येणार आहे.आज दिवसभरात विनाकारण फिरणाऱ्या अशा लोकांवर मोठ्या संख्येने कारवाई करण्यात आली. त्यांच्या दुचाकी पोलीस स्टेशनला लावून देण्यात आले आहेत.यापुढे तरी नागरिकांनी विनाकारण शहरात फिरू नये.मास्क लावावे, लॉक डाऊनच्या नियमाचे पालन करावे, अन्यथा यापुढे आणखी कडक कारवाई करण्याचा इशाराही शिर्डीचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी दीला आहे.
close