shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाॅकडाऊनमुळे कुंभार व्यवसायाचे चक्र थांबले..!!

सावळीविहीर। राजकुमार गडकरी ।
कोरोना लॉकडाऊन सुरू आहे. सर्व बंद आहे.मार्केट बंद असल्यामुळे तसेच शिर्डी शहर बंद असल्यामुळे शिर्डीत दररोज दिवे लावण्यासाठी विकल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्यांना ही आता मागणी नसल्याने शिवाय अक्षयतृतीयाला पूजनासाठी लागणाऱ्या मातीच्या कराकेळी यांनाही मार्केट उपलब्ध नसल्याने मागणी नाही,विक्री नाही. त्यामुळे आमच्यासारख्या कुंभार कारागिरांचे मोठे हाल सध्या होत आहे.अशी व्यथा रूई येथील बाबुराव हरिभाऊ वाकचौरे या कुंभार कारागिरांनी व्यक्त केली.





राहाता तालुक्यातील रुई येथे कुंभारवाड्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मातीचे माठ, रांजण, अक्षयतृतीयाला पूजन करण्यासाठी लागणाऱ्या करा केळी तसेच शिर्डीला श्री साईबाबा मंदिर परिसरात दिवे लावण्यासाठी विकल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्या मोठ्या प्रमाणात दररोज बनवण्यात येत असत.मात्र सध्या कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे.आठवडे बाजार, मार्केट, शहरे ,गावे, बंद आहेत ,सर्वजण घरात आहेत. त्यामुळे मालाची विक्री होत नाही.अक्षय तृतीयाला करा केळी यांची सुद्धा 25% यावेळी विक्री झाली नाही.तसेच दररोज शिर्डीला हजारो मातीच्या पणत्या येथे दिवे लावण्यासाठी आम्ही तेथील दुकानदारांना होलसेल मध्ये बनवून देतो. मात्र दुकानेच बंद असल्यामुळे शिर्डीत मातीच्या पणत्या विकल्या जात नाही. या सर्व गोष्टींमुळे तसेच मालवाहतूक बंद, मजूर कामावर येत नाहीत.माल विकत नाहीत. या सर्व गोष्टींचा फटका आमच्या आर्थिक बजेटवर बसला आहे.





पारंपरिक अजोबा ,वडिलांपासून करत असलेला हा व्यवसाय लॉक डाऊनमुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे.तरी आम्हांला शासनाने मदत करावी आमच्यासारख्या छोट्या-मोठ्या कारागिराकडे कडे लक्ष द्यावे.असे रूई चे कुंभार कारागीर हरिभाऊ वाकचौरे व सागर कुसळकर यांनी सांगितले.तसेच जरी या कालावधीत आमच्यासारखे कारागीर, कलाकार अडचणीत आले असेल तरीही काही हरकत नाही.परंतु प्रत्येकाने आपापल्या घरात रहावे. सण-उत्सव घरातच करावे.घराबाहेर पडू नये या वर्षी झालेला तोटा पुढच्या वर्षी भरून काढू मात्र आपले आरोग्य प्रत्येकाने सांभाळावे.असे आव्हान छबुराव वाघचौरे व सागर कुसाळकर यांनी यावेळी केले.
close