shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ पूर्वेकडील वॉर्ड क्र.45 चे भाजप कार्यकर्ते तथा समाजसेवक सर्जेराव माहुरकर यांनी सामाजिक कार्य केल्याबद्दल "अंबरनाथ मानवसेवा पुरस्कार" सन्मान देऊन सत्कार

अंबरनाथ - प्रतिनिधी - जाफर वणू
अंबरनाथ व्यापारी संघ व कच्छी विशा ओसवाल जैन संघ यांच्यावतीने वॉर्ड क्रमांक 45 येथील भाजप कार्यकर्ते व समाजसेवक श्री सर्जेराव माहुरकर यांना "अंबरनाथ मानव सेवा पुरस्काराने" गौरव करण्यात आला.



या गौरव सत्कारचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोना
वायरससारख्या भयंकर रोगाने संपूर्ण देशभरात धुमाकुळ घातल्याने दि. २४ मार्चला सरकारने लॉकडाउन घोषीत करण्यात आल्यापासुन स्वतःची व परिवाराची काळजी न करता फक्त नागरिकांची काळजी घेत ते विविध सेवेत मग्न राहून अडचणीत सपडलेल्या गोरगरीब गरजुवंताना कामधंदा नसल्याचे लक्षात येताच भाजप अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष अभिजीत करंजुले पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्ते व समाजसेवक सर्जेराव माहुरकर यांच्यावतीने परिसरात सामाजिक कार्य करण्यात आले.

तसेच वॉर्ड क्रमांक 45 येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व समाजसेवक श्री सर्जेराव माहुरकर यांनी सामाजिक जाण ठेवून व प्रशासनाचे नियम पाळून जी निस्वार्थ पणे विविध सामाजिक उपक्रम राबवून सेवा करत आहेत, त्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा "अंबरनाथ मानव सेवा पुरस्काराने" गौरव करण्यात आला. यावेळी भाजप शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील, अंबरनाथ व्यापारी संघटना अध्यक्ष कानजीभाई धलं व भाजपा अंबरनाथ व्यापारी शहराध्यक्ष भगवानभाई सोलंकी, वाघजी पटेल, वीर बाजीप्रभू देशपांडे, पथ व्यापारी संघटना उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी विस्तारक संतोष शिंदे, विश्वास निंबाळकर, मनीष गुंजाळ तसेच प्रमुख पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
close