भाग १
मित्र हो …
खर तर या माहितीच्या आधारे व ज्ञानाने कोणीही एखादा चांगला व्यवसाय करु शकतो. परंतु माझी नेहमी अशीच इच्छा असते की मला मिळालेली चांगली माहीती आणि ज्ञान सर्वाना मिळावी. पुढील लेख हा प्रत्येकाने आपल्या जवळ कायम जपुन ठेवण्यासारखाच आहे. किंबहुना मी आज पर्यंत प्रसिद्ध केलेले लेख हे मानवाच्या आयुष्याशी निगडीत असुन त्याचा उपयोग होणारेच आहेत. अशा प्रकारची भरपुर माहिती अजुनही मिळवित असुन अशा प्रकारच्या माहीतीचे एक डिजीटल पुस्तक प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. असे समाजपोयोगी कार्य करताना ज्या मुलभुत सोयी सुविधा लागतात त्याना अल्प असा तरी का होइना पण खर्च येतो. अशा ज्ञानाचे व वेगवेगळ्या विषयांवरील माहीतीचे ज्ञानाचे एक केंद्र अर्थात वेब साईट काढावी असा मानस आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पाकरीता आर्थिक गुंतवणूक आवश्यक असते. अशी गुंतवणुक सर्वांच्या सहाय्याने झाली तर काही अल्प अशा प्रत्येकाच्या मदतीने ती पुर्ण होवु शकते. ज्याना अशा प्रकारची मदत करता येणे शक्य आहे अशा व्यक्ती समाजाकरीता सामाजिक बांधिलकी म्हणुन तयार असतील त्यानी संपर्क साधुन
आपली मते सांगावित.
श्रीकृष्ण पंडित
9420054040
9420054040
- आजचा लेख हा महत्वाचा आहे.
घरातील दवाखाना अर्थात औषधी वनस्पती आणि त्यांची माहीती पूर्वी कुणाला खोकला, सर्दी पडसं झाले कि डॉक्टरकडे न जाता अडुळशाचा काढा, गवती चहाचा काढा असे द्यायचे. पोटात दुखायला लागले कि ओव्याचा अर्क किंवा पाण्यात हिंग टाकुन द्यायचे. मुका मार लागला असता निर्गुडीच्या पालांचा लेप गरम करून त्या भागावर लावला जायचा. लहानपणी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आम्हाला कडु किराईताचा काढा प्यायला द्यायची. अतिशय कडु असलेला हा काढा जबरदस्तीने प्यायला लागायचा. हा इतका कडु कि याच्या काडीला स्पर्श करून बोट तोंडात टाकले असता जबरदस्त कडवटपणा यायचा. अर्थात हे सारे शरीरासाठी चांगले म्हणुन ते इच्छा नसताना प्यायला लागायचे.
अशाच प्रकारच्या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती आहेत पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. बर्याचवेळा त्या वनस्पती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर, "अरे, याला अमुक अमुक म्हणतात का?" हे तर आमच्या इथे भरपूर आहे अस ऐकायला मिळते. तर कधी "आजुबाजुला अडुळशाचा पाला आहे, पण त्याचा काढा कसा करायचा ते माहित नसते" किंवा केला तरी तो कोणत्या मात्रेत द्यायचा हे माहित नसते. आज पेनकिलरने त्वरीत आराम जरी मिळत असला तरी सतत सेवनामुळे त्याचे शरीरावर वाईट परीणाम होतात. म्हणुनच कि काय आजही वनौषधीला पर्याय नाही.
आपणांसही या सार्या औषधी वनस्पतींची माहिती आणि ओळख एकत्र मिळावी म्हणुन हा वेगळा धागा काढतोय. यापैकी काही वनस्पतींची लागवड घरच्या घरी करणे सहज शक्य आहे.
- अडुळसा
सामान्य नावे : मराठी-अडुळसा, अडुसा, वासा वसाका,गुजराती.-अडसोगे, अडुसो, अर्डुसी, हिंदी.-अडाल्सो, अरूशो, वसाका, कानडी अडसला, अडुमुत्तडा, अडुसोगे, संस्कृत. सिंहिका, वसाका, अटरूष.
वर्णन : १.२ ते २.८ मी.उंचीचे दाट झुडुप, फांद्या एकमेकांविरूध्द, वर जाणाऱ्या. पाने: १२-२० X ४-६ सें.मी. दीर्घवर्तुळाकार, कुंतसम. वरील पाने गर्द हिरवी खाली पांडूर.
फुले : कक्षस्थ कणिशात, फांद्यांच्या टोकांवर, पुष्पकोश नलिकाकृती, पांढरा, गुलाबी रेषांसहीत,
फळ : बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिकाकृती. फुल वेळ : ऑगस्ट-नोव्हेंबर.
अधिवास : बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते.
स्थान : महाराष्ट्र राज्यभर कुंपणांमध्ये, दख्खन व कोकणात विपुल.
प्रसार : भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया.
उपयुक्त भाग : मूळे, पाने, फळे व फुले.
मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे . कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद) आहे . मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी आहे ,आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी) आहे .अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी
प्रसार : भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया.
उपयुक्त भाग : मूळे, पाने, फळे व फुले.
मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे . कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद) आहे . मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी आहे ,आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी) आहे .अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी
आहे.आयुर्वेदानुसारखोकला,काविळ,दमा,श्वास,कफ,
क्षय,त्रिदोष,मुख,मुत्रघात,सुज इत्यादी रोगांवर उपयुक्त आहे. मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी आहे . पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गूणकारी आहे . वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माश्या , पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात.
अडुळसाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते
संस्कृत-अटरुप
हिंदी-आरुखा,आडसा,वासक
गुजराती-अडुरशी
कन्नड-आडसोने
तामिळ- आडाडोई
तेलगु-आढासारं,आंडापाकु
लॅटीन- Justicia adhatoda, (Adhatoda Vasica)
संस्कृत-अटरुप
हिंदी-आरुखा,आडसा,वासक
गुजराती-अडुरशी
कन्नड-आडसोने
तामिळ- आडाडोई
तेलगु-आढासारं,आंडापाकु
लॅटीन- Justicia adhatoda, (Adhatoda Vasica)
- अश्वगंधा
अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेद उपचारांमधील ही महत्त्वाची वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसॅंग म्हणून ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही वनस्पती आहे. आहे. हिच्या दोन जाती असतात. १.देशी- ही जंगलामध्ये आढळते. २. दुसरी- ही पेरणी करून उगविली जाते. हिच्या मुळांचा वापर आयुर्वेदचिकित्सेमध्ये केला जातो. 'बुढापे का सहारा अश्वगंधा विधारा।।' अशी एक म्हण प्रसिद्ध आहे.
अश्वगंधा यांचा वापर करून बनवलेले अजाअश्वगंधादि लेहम् नावाचे औषध आयुर्वेद चिकित्सेमधे वजनवर्धक व शक्तिवर्धक म्हणून वापरतात.
भारतीय आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून वर्णिलेल्या अश्वगंधा या वनस्पतीकडे सार्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अशाच प्रकारची एक वनस्पती चीनमध्ये फार लोकप्रिय आहे. तिला जिनसेंग असे म्हणतात. त्यामुळेच वैद्यकीय शास्त्रात अश्वगंधा वनस्पतीला भारतीय जिनसेंग असे संबोधले जायला लागले आहे. ही वनस्पती माणसाच्या अंगातील जोम वाढविण्यास कारणीभूत ठरते आणि आजारी व्यक्तीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते.
जिनसेंग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त
इन्फुलएन्झा म्हणजे सर्दीत श्वसनाचे विकार होतात. घटती प्रतिकारशक्ती व प्रदूषण ही त्याची कारणे आहेत. ‘जिनसेंग’ या चिनी वनौषधीने त्यावर चांगला परिणाम होतो.
इन्फुलएन्झा म्हणजे सर्दीत श्वसनाचे विकार होतात. घटती प्रतिकारशक्ती व प्रदूषण ही त्याची कारणे आहेत. ‘जिनसेंग’ या चिनी वनौषधीने त्यावर चांगला परिणाम होतो.
- मरवा
मरवा ही सुगंधी बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑरिगॅनम मॅजोरॅना आहे. ती मॅजोरॅना हॉर्टेन्सिस या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिका येथील असून ती भारतात बागेमध्ये वाढविली जाते. मॅजोरॅना प्रजातीत सहा जाती असून त्यांपैकी वरील जातीची लागवड केली जाते.
मरवा (ऑरिगॅनम मॅजोरॅना) : पाने आणि फुलोरा यांसह वनस्पती
मरवा वनस्पतीचे खोड शाखित असून ती ३०–६० सेंमी. उंच वाढते. पाने साधी, राखट हिरवी, लहान व सुगंधी असतात. फुले पांढरट किंवा जांभळ्या रंगाची असून ती गुच्छात येतात. हे गुच्छ शेंड्याकडे येतात. फुलांची रचना तुळशीच्या कुलातील सब्जा व पुदिना या वनस्पतींसारखी असते. बिया अनेक व लहान असून त्यांचा रंग गर्द तपकिरी असतो. त्यांत तेल असते.
मरवा वनस्पतीची लागवड तिच्यापासून मिळणाऱ्या सुगंधी तेलासाठी केली जाते. पानांच्या आणि फुलांच्या ऊर्ध्वपातनाने तेल मिळवितात. तेल रंगहीन किंवा पिवळसर रंगाचे असते. तेलात अनेक रासायनिक संयुगे असून त्यांपैकी बोर्निऑल, पाइनीन व कापूर ही महत्त्वाची संयुगे असतात. या सुगंधी तेलाचा उपयोग साबण, अत्तर व मद्य यांमध्ये करतात. तसेच मसाल्याचे पदार्थ, भाजी व शिर्का यांमध्ये तिची पाने सुगंधाकरिता वापरतात. मरवा वनस्पती वायुनाशी असून कफ घालविणारी आहे.
- टाकळा
- ओवा
पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो.
- वेखंड
पाव ग्रम वेखंडाचे पूड मधासोबत रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्याने सपाटून भूक लागते.
पोटदुखीचा त्रास होत असल्यास पेलाभर ताकात अर्धा ग्रम वेखंडाची पूड मिसळून व चिमूटभर मिठ घालून ते प्यावे. पोटटुखी कमी होते.
मोठ्या माणसात अपस्माराचा त्रास असल्यास अर्धा ग्रम वेखंडाचे पूड मध व वेलदोड्याचे चूर्ण घालून दिल्यास फेफरयात लाभदायी ठरते.व आकडी थांबते.
वेखंडाचे चूर्ण धोतरासारख्या पातळ वस्त्राच्या फडक्यात बांधून ती पोटळी फेफरे आलेल्या रुग्णास हुंगविल्यास तो सावध होतो
- वनई उर्फ निरगुडी
पुर्ण माहीती पुढील लेखात.
- रुई
रूईची पानं शनिवारी मारुतीला वाहातात. त्याचा वापर पूजेअर्चेसाठी केला जातो. पूजेसाठी वापरल्या जाणार्या या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत. त्याची फुले, पाने यांचा उपयोग अस्थमा, मधुमेह, कुष्ठरोग आणि मूळव्याध यासारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी केला जातो.
मंदार, अर्क किंवा अकोवा किंवा रूई या नावाने ओळखले जाणारे हे झाड विषारी असूनही त्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या झाडाची फुले, पाने कोणत्या आजाराला दूर ठेवू शकतात ते पाहू या.
मधुमेह - मधुमेही व्यक्तींनी हे पान पायाच्या तळव्यावर ठेवून त्यावरून पायमोजे घालावेत. रात्री झोपण्यापूर्वी हे पान काढून टाकावे. यामुळे साखर नियंत्रित होण्यास मदत होते.
कुष्ठरोग - रूईची पाने कुटून त्यात मोहरीचे तेल घालावे. हे मिश्रण कुष्ठरोगाच्या जखमांवर लावावे. नियमित लावल्यास जखमा भरून निघतात.
मूळव्याध - रूईचे पान आणि त्याचे देठ पाण्यात भिजत घालावे. या पाण्याने मूळव्याधीची समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकते.
जखम होणे - शरीराच्या कोणत्याही भागाला इजा झाल्यास रूईचे पान गरम करून बांधावे. त्यामुळे जखमेतून रक्त वाहणे बंद होते. तसेच सूज आणि वेदनाही कमी होतात.
खाज येणे - त्वचा अॅलर्जी किंवा रूक्षपणा यामुळे खाज येते. यापासून सुटका मिळवण्यासाठी रूईचे देठ जाळून त्याची राख तेलात मिसळून ती खाज येणार्या जागी लावावी.
अस्थमा - रूईची फुले सुकवून रोज त्याचे चूर्ण खाल्ल्यास अस्थमा, फुफ्फुसांचे आजार आणि शरीराला आलेला अशक्तपणा दूर होतो.
अनेक विषयांची अनेक प्रकारची माहिती माझ्याकडे संकलित केली आहे इथे झाड हा विषय असल्यामुळे फक्त झाडांचे औषधी गुणधर्म या विषयावरच माहिती देत आहे वस्तुतः ही माहिती पिढ्यानपिढ्या सांगत आलेली आहे जगात असे कोणतेही झाड नाही की त्याचा त्या त्या प्रदेशात त्याचा उपयोग नाही विशेषतः प्रत्येक वनस्पतीमध्ये कोणता ना कोणता तरी औषधी गुणधर्म असतो परंतु तो कोणता आहे त्याची मात्रा किती हे जाणकारांकडूननच समजून घेतले पाहिजे हे तितकंच खरं पुढील पिढीला अशा प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी म्हणूनच हा प्रपंच
जनसामान्यांसाठी सदैव तत्पर …
श्रीकृष्ण पंडित रत्नागिरी
8668329202
9420054040
8668329202
9420054040









