shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉक डाऊन काळात यू टेक शुगर च्या साखर गोदामला आग लागणे ही अत्यंत दुर्दैवी व संशयास्पद घटना आहे..!!

देवळाली प्रवरा /अहमदनगर :
सध्या साखर कारखाना सिजन बंद आहे,  कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे, तसेच साखर हा काही ज्वलनसील पदार्थ नाही, त्यामूळे भुसा पेटतो तसी साखर पेटली ही बाब पटत नाही. 



आणि तब्बल पाच हजार शेतकरी बांधवांचे  थकलेले उस बिल अदा करण्यासाठी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब यांनी आमचे मागणी वरुन दोन दिवसापूर्वीच संबंधीत विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. त्याची बातमी प्रसिद्ध झालेबरोबर ही घटना घडल्याने हे सर्व संशयास्पद वाटतेय. 

त्यामूळे यू टेक शुगर च्या या साखर गोदाम जळीत घटनेची उच्यस्तरीय चौकशी होवुन शेतकरी बांधवांची जानेवारी पासून थकित असलेली ऊसाची देय रक्कम अदा होणे आवश्यक आहे. असे आप्पासाहेब भिमराज ढुस, देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर यांनी निवेदनात म्हटले आहे.
close