shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार बालाजी देशमुख यांच्यावर वाळुमाफीयांचा जिवघेणा हल्ला;विविध पत्रकार संघटनेकडुन निषेध

हिंगोली/प्रतिनिधी  (विश्वनाथ देशमुख)
दि.26 एप्रिल हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील मौजे गुगळप्रिंप्री येथील पत्रकार बालाजी देशमुख यांनी दि.24 एप्रिल शुक्रवार रोजी अवैध वाळु संदर्भात बातमी प्रकाशित केली होती याचा राग मनात धरून पत्रकार देशमुख यांच्यावर वाळुमाफीया व गावगुंडानी जिवघेणा हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले असुन याच्या निषेधार्थ सेनगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत हल्ला करणा-या वाळुमाफीयांवर व गावगुंडाना त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.





वास्तविक पाहाता गौणखनिजाची चोरी करून लाखो रूपयाची वरकमाई ह्या माध्यमातून होते.हा गोरख धंदा सर्रास चालु असतांना बातमी प्रकाशित झाल्याने त्यांचे पित्त खवळले यातुनच त्यांनी पत्रकार बालाजी देशमुख यांच्यावर जिवघेणा हल्ला करून दहशत माजवुन मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे.सदर वाळु माफीया आणि गावगुंडाना तात्काळ अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे व पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्या बाबत न्याय द्यावा.निवेदनावर सेनगाव तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख,उपजिल्हाध्यक्ष राजकुमार देशमुख,देविदास कुंदर्गे,विश्वनाथ देशमुख,बबन सुतार,केशव भालेराव,गजानन वाणी,विठ्ठल देशमुख आदी पत्रकार बांधवाच्या स्वाक्ष-या आहेत.
close