shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना संकटात गरिबांच्या सेवेसाठी धावले दानशुर देहरे कर आमदार निलेश लंके यांच्याहस्ते गरिबांना किराणाचे वाटप.


देहरे : | प्रतिनिधी |   

     कोरोनाव्हायरस मुळे आपल्या देशात 21 दिवसाचा लॉक डाऊन असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेले आहे ग्रामीण भागामध्ये काही असे कुटूंब आहेत की ते कुटूंब दररोज कुठं तरी काम करूनच आपली उपजिविका करत रोजी रोटी  भागवत असतात, परंतू कोरोना महामारी संकटाच्या परिस्तिथी मध्ये त्या गरिबांच्या घरात काहीच नाही, पैसा नाही , शासनाच्या योजना पोहोचल्या नाहीत मग या लोकांनी करायचं काय .?





     या पार्श्वभुमीवर अशा लोकांंसाठी काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने त्यांच्या साठी "आजी माजी सैनिक संघटना देहरे आणि "देहरे सैनिक अकँडमी " व  दानशुर लोकांनी एक मदतीचा हात देऊन जी काही मदत मिळाली आहे अशी मदत गोर गरिबांना,गरजूंना  १५ दिवसाचे  किराणा सामान पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या शुभ हस्ते देण्यात आले.



       यावेळी देहरे सैनिक अकँडमी चे अध्यक्ष मेजर सुनील बालवे व मेजर संतोष काळे ,आजी माजी सैनिक संघटना देहरे,देहरे सैनिक अकँडमी ,सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व देहरे गावातील आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

शिर्डी एक्सप्रेस साठी आपल्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा-
 shirdiexpress7273@Gmail.com

संपादक - श्री. रमेश जेठे मो. ९९६०८५४७६५
close